Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

'शिवायन' महानाट्याच्या भव्य रंगमंचाचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

'शिवायन' महानाट्याच्या भव्य रंगमंचाचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर महानाट्याचे आयोजन

मालवण : 'शिवायन' या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी करण्यात आले आहे. या महानाट्याच्या भव्य रंगमंचाच्या उभारणी कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपगराध्यक्ष राजु वराडकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवा उद्योजक प्रितम गावडे, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवामोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, शिवसेना महिला उपाजिल्हा प्रमुख निलम शिंदे, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, आशा वळपी, अंजना सामंत, राणी पराडकर, लुडडीन फर्नांडिस, क्रांती धुरी, मधुरा तुळसकर, राजु बिडये, पराग खोत, दीपक धुरी, तोडणकर, खवणेकर यांसह तुळशीदास गोवेकर, बाबू धुरी, गणेश परब, भाऊ मोरजे, सुशील शेडगे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या आणि त्यांच्या मर्द मावळ्यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या हिंदवी स्वराज्य निर्मितीची वैभवशाली कथा. शिवपूर्व काळापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंतच्या अनेक प्रसंगाच्या नाटकातून सादरीकरण म्हणजेच 'शिवायन - ऐतिहासिक महानाट्य' छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण आयुष्यच नाट्यमय प्रसंगानी भरलेले आणि भारलेले आहे. मातृप्रेम, पितृप्रेम, स्त्रियांचा आदर, प्रखर राष्ट्रभक्ती, माणसाला माणूस म्हणून वागविण्याची प्रवृत्ती, गुन्ह्याला कठोर शासन आणि योग्य धाडसाला कौतुकाची थाप ही शिवशाहीची बीज आज समाजात रुजवणे आवश्यक आहे. शिवायन या ऐतिहासिक महानाट्यासाठी ७२ फूट व ४० फूट भव्य रंगमंच व किल्ल्याचे भव्य नेपथ्य साकारण्यात येणार आहे. ४०० फूट व ४०० फूट भव्य प्रेक्षागृहासह १०० पेक्षा अधिक कलाकारांचा या महानाट्यामध्ये सहभाग असणार आहे. अत्याधुनिक ध्वनी आणि प्रकाशयोजना आकर्षक व नेत्रदीपक आतषबाजी, उत्कृष्ट संगीताने सजलेले महानाट्य, एकाच वेळी किमान आठ ते दहा हजार प्रेक्षकसंख्या, अभिजात आणि सर्व प्रमुख लोककलांचा सहभाग, श्री भवानी देवीची मूर्ती, आकर्षक सिंहासन व इतर नेपथ्य अशी अनेक वैशिष्ट्ये या महानाट्याची आहेत. या महानाट्यामध्ये घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर केला जाणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. शिवपुर्वकाळ ते राज्याभिषेकापर्यतच्या अनेक प्रसंगांचे सादरीकरण यां महानाट्यातून होणार आहे.

rapan bottom