'त्या' गटाराचे काम अखेर पूर्ण…
जुबेर खान | मालवण : मालवण शहरातील भरड ते फाटक शाळा दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांची दुर्दशा झाली होती. गेली अनेक वर्ष पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरत होती. ही बाब स्थानिकांनी मालवण नगरपालिका माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या निदर्शनास आणून दिली.
मालवण नगर पालिका माजी नगरसेवक यतीन खोत यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेत नगरपालिकेच्या विशेष रस्ता अनुदानातून निधी उपलब्ध करून घेण्यात महत्वाची भुमिका बजावली व गटार दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आणले. या गटार दुरुस्ती कामामुळे रस्ता आधीपेक्षा रुंद झाला आहे, ज्यामुळे वाहनचालकांना अरुंद रस्तामुळे होणारी गैरसोय देखील दूर झाली आहे. स्थानिक नागरिक यांचीही याबाबत मागणी व पाठपुरावा महत्वपूर्ण ठरला

