मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा काजु फॅक्टरी ते हॉटेल दर्यासारंग यां खड्डेमय रस्त्याच्या कामास अखेर सुरवात झाली असून डांबरीकरण कामही लवकरच पुर्ण केले जाणार आहे. नागरिक, विविध पक्ष पदाधिकारी व माजी लोकप्रतिनिधी मंदार केणी, यतीन खोत, दर्शना कासवकर यांनी यां रस्ता प्रशनी सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधले होत. अखेर काम हाती घेण्यात आले आहे.
याबरोबर साई मंदिर बाजूला असलेल्या संस्कृती पार्क येथे जोडणाऱ्या रस्त्याचे कामही पूर्णतःवास जाणार आहे. याबाबत माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, दर्शना कासवकर यांनी पालिका प्रशासन व शासनाचे आभार मानले आहेत.

