Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

मालवण नगरपरीषद येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

मालवण नगरपरीषद येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

महिला बचत गटांच्या सदस्या तसेच महिला अधिकारी, कर्मचारी यांची विशेष उपस्थिती

अमित खोत | मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन मालवणातील महिला बचत गटांच्या सदस्या, विविध शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विशेष उपस्थितीत मालवण नगरपरिषद येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या संकल्पनेतून आयोजित यां कार्यक्रमात सांगली येथील कवी नितीन चंदनशिवे, कृषी अधिकारी जयश्री दुधभाते, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता सेन्हा लोखंडे, सुरेखा खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचा शुभारंभ समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आला. यावेळी कवी नितीन चंदनशिवे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. तसेच स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून उपस्थितांना महिला दिनाच्या उद्देशांची महती समजावली व शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे म्हणाले, महिलांचे सक्षमीकरण हे महत्वपूर्ण असल्याचे सांगत मार्गदर्शन केले. तसेच महिलांना शुभेच्छा दिल्या.
कृषी अधिकारी जयश्री दुधभाते, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता सेन्हा लोखंडे यांनीही विचार मांडले.

या कार्यक्रमात मालवण नगरपरिषदेच्या वतीने मान्यवरांना 'मालवण व्हिजन' या स्मरणिकेची प्रत भेट देण्यात आली. नगरपरीषदेच्या वतीने उपस्थित महिलांना भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सदिच्छा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी यांनी केले तर श्री. खेमराज सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. नगरपरिषद अधिकारी सोनाली हळदणकर, महेश परब यांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

rapan bottom