
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या आमदार फंडातून वराड गावातील वराड ब्राम्हण स्थळ हा मुख रस्ता मंजूर होऊन काम पुर्ण झाले आहे. मागील दहा वर्षात जे काम झाले नाही त्यासाठी आमदार निलेश राणे यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. पाच लाख निधीतून रस्ता काम पुर्ण झाले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार काम झाल्याने ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. निवडणुकीतही याठिकाणी मताधिक्य होते. येथील जनता महायुती सोबतच राहिली आहे. आगामी काळात खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावात विकासाची गंगा येईल. असा विश्वास भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा माधुरी मसुरकर यांनी व्यक्त केला.

