Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कुडाळच्या ओंकारला विद्यापीठात सुवर्णपदक

कुडाळच्या ओंकारला विद्यापीठात सुवर्णपदक

एम. एस्सी. गणित स्पर्धेत सुवर्णपदक

मिली मिश्रा | कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षातील एम.एस्सी. गणिताच्या परीक्षेत कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयातील ओंकार दत्ताराम तेंडोलकर यांनी सर्वोच्च यश मिळवत सुवर्णपदक पटकावले. ७ जानेवारी रोजी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते गौरवण्यात आले. विद्यापीठात गणित विषयात सर्वोच्च गुण मिळवून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

ओंकार यांनी आपल्या जिद्द, कठोर मेहनत आणि सखोल ज्ञानाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांनी गणितातील IAVM द्वारे घेतल्या जाणाऱ्या लीलावती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून IYMC या जागतिक ऑलिम्पियाड स्पर्धेत सिल्व्हर हॉनर पटकावला आहे, ज्यामुळे त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

आपले हे यश त्यांनी आपल्या पालक, प्राध्यापक आणि मार्गदर्शकांना समर्पित केले आहे. ओंकार च्या या यशामध्ये संत राऊळ महाराज, महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख डॉक्टर एस.के. पवार आणि गणित विभागातील इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले, त्याचबरोबर रसायनशास्त्र विभागाचे अजित कानशिडे सर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.

भविष्यात गणित शिक्षण आणि संशोधनात मोलाचे योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे. ओंकार यांची गणितातील आवड केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून, ते आपल्या "Omkar_10dolkar" यूट्यूब चॅनेल व ब्लॉगद्वारे गणित विषयक ज्ञान पसरवत आहेत. वैदिक गणितावर त्यांनी लिहिलेले ब्लॉग विशेष लोकप्रिय झाले आहेत. तसेच, IYMC सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

ओंकारच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांची ही सुवर्णमय कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

rapan bottom