Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा मालवणात उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा मालवणात उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

दिविजा सातपुते, लीना धुरी, श्रेया मांजरेकर, शर्वरी पाटील, अनुष्का कदम, अनिता आळवे विजेत्या

मालवण | प्रतिनिधी : महिला दिनानिमित्त ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण तर्फे महिलांसाठी आयोजित ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवारी मालवणात उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. स्पर्धेत दिविजा संदीप सातपुते, लीना नरेश धुरी, श्रेया सागर मांजरेकर, शर्वरी महादेव पाटील, अनुष्का नागेश कदम, अनिता आळवे यांनी प्रथम क्रमांक पटकावीला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिलांसाठीची मॅरेथॉन स्पर्धा असलेल्या या स्पर्धेचे यावर्षी तिसरे वर्ष होते. मालवण देऊळवाडा येथून सागरी महामार्ग ते कोळंब पूल असा या मॅरेथॉनचा मार्ग होता. देऊळवाडा येथे या स्पर्धेचे उदघाटन गतवर्षीच्या ज्येष्ठ गटातील विजेत्या सौ. वैशाली प्रभूझाट्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल
१० ते १५ वर्षे वयोगट (२ किमी )- १. दिविजा संदीप सातपुते, २. महिमा विशाल मोहिते, ३. हर्षाली सत्यवान वेंगुर्लेकर, ४. धनश्री प्रशांत परब, ५. गार्गी संदेश पाडगावकर. १६ ते २५ वयोगट(२ किमी )- १. लीना नरेश धुरी, २. मेघा प्रमोद सातपुते, ३. रेश्मा रावबा पांढरे, ४. तृप्ती शरद माडये, ५.दिक्षा देवू झोरे, २६ ते ३५ वयोगट(२किमी )- १. श्रेया सागर मांजरेकर, २. गीतांजली चंद्रकांत चव्हाण, ३. पद्मिनी प्रकाश मयेकर, ४. आराध्या प्रसाद गवंडी, ५. स्नेहल विष्णू ढोके.

३६ ते ४५ (२ किमी )- १. शर्वरी महादेव पाटील, २. चंद्रकला प्रमोद सातपुते, ३. नीलम प्रसन्न मयेकर, ४. प्रेरमा देवेंद्र लोहार, ५. अक्षता अनंत कोपकर. ४६ ते ५५ वयोगट (चालणे, धावणे दोन्ही, २ किमी)- १. अनुष्का नागेश कदम, २. अस्मिता संजय रावराणे, ३. बितौज जॉन फर्नांडिस, ४. दिपाली दिलीप शिंदे, ५. दीपिका दिलीप वाईरकर. ५६ वर्षा पुढील महिला - चालणे,धावणे दोन्ही, २ किमी) - १. अनिता आपा आळवे, २. अमृता वेझरे, ३. वैशाली प्रभूझाट्ये, ४. ज्ञानज्योती बिनसाळे, ५. मीना फर्नांडिस.

प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकाच्या विजेत्या महिलांना आकर्षक चषक, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ क्रमांकांना पारितोषिके देण्यात आली. सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल देण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून रेनॉल्ड बुतेलो, बंटी केरकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. यावेळी ग्लोबल रक्तदाते व ग्लोबल रक्तविरांगना समूहाचे सर्व सदस्य, स्वयंसेवक उपस्थित होते.

rapan bottom