Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

वसा समाजसेवेचा ; सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमांचे होतंय कौतुक

वसा समाजसेवेचा ; सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमांचे होतंय कौतुक

मालवणातील आरोग्य तपासणी शिबिरात ५६० जणांची तपासणी ;

मालवण : समाजसेवेचा वसा हाती घेत सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवताना सर्वासामान्य जनतेशी जोडलेले मालवणचे समाजरत्न सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या माध्यमातून राबवण्यात येणारे सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरतात. सामाजिक जाणीवेतून राबवल्या जाणाऱ्या यां उपक्रमाना विविध सामाजिक संस्था, नागरिक यांसोबत प्रशासनाचीही महत्वपूर्ण साथ लाभते. जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल-ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर, सिंधुदुर्ग व पडवे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी यां शिबिराचा लाभ घेतला. ५६० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी आयोजित रक्तदान शिबिरातही अनेक रक्तदात्यानी रक्तदान केले.

शिबिराचे उदघाट्न मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिवप्रतिमेस पुष्पहर अर्पण करून झाले. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, वाइल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्गच्या सल्लागार सौ. शिल्पा यतीन खोत, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, सचिव दादा वेंगुर्लेकर, लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष बाळू अंधारी, क्रीडा अधिकारी शितल शिंदे, क्रीडामागदर्शक माधुरी घराळ आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी, कर्करोग तपासणी, प्रसुतीशास्त्र, स्त्रीरोग तपासणी, नेत्र तपासणी, अस्थिरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा करण्यात आली. ५६० जणांची तपासणी करण्यात आली. काही रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. यामध्ये मोतीबिंदूच्या ५० रुग्णांचे निदान झाले असून त्यांच्यावर शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी तहसीलदार वर्षा झालटे व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचा विशेष सन्मान सौ. शिल्पा खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वराज्य ढोल ताशा पथकाचा वर्धापन दिन केक कापून साजरा झाला.

यावेळी माजी नगरध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, भाई कासवकर, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष प्रतिभा चव्हाण, स्वाती तांडेल, अश्विनी आचरेकर, दिक्षा लुडबे, लायन्स क्लबचे मुकेश बावकर, महेश कारेकर, गणेश प्रभुलीकर, राजा शंकरदास, अनुष्का चव्हाण, अंजली आचरेकर, रेखा गावकर, नंदिनी गावकर, मनाली दळवी, मानसी घाडीगावकर तसेच ललित चव्हाण, भाऊ सामंत, नंदा सारंग, अंजना सामंत आदी उपस्थित होते.

सामाजिक भावानेतून आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे अनेकांनी कौतुक केले. तसेच शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांनीही आभार व्यक्त केले.

rapan bottom