Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

मालवण | जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक कला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

मालवण | जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक कला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

मालवण : मालवण एज्युकेशन सोयायटी संचालित जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण येथे शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक कला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक ७ ते ८ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील विविध कलाकृतींची मांडणी या प्रदर्शनात केलेली आहे. स्मरणचित्र, संकल्पचित्र, वस्तुचित्र, अक्षरलेखन, मुक्तहस्त चित्र, व्यक्तिचित्र, प्रिंटमेकिंग,अशा विविध प्रकारांमधील चित्रांचा यात समावेश आहे. तसेच हस्तकलेतील मुलांनी बनवलेल्या विविध कलाकृती या प्रदर्शनात मांडलेल्या आहेत. या प्रदर्शनाचे परीक्षण टोपीवाला हायस्कूल चे कलाशिक्षक बलराम सामंत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अशा विविध उपक्रमांचे आयोजन प्रशालेमार्फत वारंवार करण्यात येते.


तसेच इयत्ता 3 री ते 8 वी मधील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर विज्ञान प्रतिकृती तयार केल्या होत्या. इको फ्रेंडली, पर्यावरण पूरक, कमी इंधन वापराचे, सौर ऊर्जे वर चालणारे, घरगुती वापराचे असे अनेक छोटे छोटे आणि सोपे प्रयोग या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.


कला व विज्ञान प्रदर्शना साठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका तेजल वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेचे शिक्षक निशिकांत पराडकर, स्मिता वायंगणकर, राहुल तारी, अमेय नाईक, स्वाती पाटकर, स्नेहल तोडणकर, हर्षा सावंत, दीपक जाधव यांनी मेहनत घेतली.इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

rapan bottom