Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

सिंधुकन्या | प्रतिभासंपन्न अभिनेत्री पूजा खानोलकर

सिंधुकन्या | प्रतिभासंपन्न अभिनेत्री पूजा खानोलकर

जागतिक महिला दिन विशेष

मिली मिश्रा | स्काय न्युज टुडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प्रतिभासंपन्न कलावंत पुजा खानोलकर यांना लहानपणापासूनच नाटक, अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले. स्वतःच्या हिमतीवर आज त्यानी अभिनय क्षेत्रात पाय रोवला आहे. पूजा यांना २०२५ मध्ये "वेबसिरीज कॅटेगरी मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री" म्हणून मानांकन मिळालं आहे. सर्वप्रथम पूजा खानोलकर यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

पूजा खानोलकर यांचे बालपण कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील. तिच्या घरचे वातावरण हे नेहमी साहित्य, नाटक, चित्रपट आणि कला असे हौशी राहिले. वयाच्या ९ व्या वर्षापासून पूजा यांनी कथ्थक या शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले. २०२१ या वर्षी त्या कथ्थक विशारद झाल्या. सौ. अनुजा गांधी या त्यांच्या कथ्थक गुरू. कुडाळ हायस्कूल कुडाळ या शाळेत शिकत असताना वयाच्या १३ व्या वर्षी तिचे कलागुण हेरून पुजा यांना पहिल्यांदा बालनाट्य मध्ये काम करण्याची संधी दिली. आणि तिथ पासून पूजाच्या अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. कुडाळमधील बाबा वर्दम थिएटर्स या संस्थेअंतर्गत पूजा ने अनेक वर्षे नाट्य कला जोपसली.

पुजा यांचे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर हौशी राज्य नाट्य स्पर्धेमधून नाटकं केली. त्यासाठी अभिनय गुणवत्ता प्रमाण देऊन पूजाचा गौरव सुद्धा करण्यात आला. तेव्हापासून ते आतापर्यंत या कलेला जोपासता येईल अशा क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पूजा यांनी तिचे पदवी शिक्षण संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ मधून इकॉनॉमिक्स या विषयात केले. त्या तीन वर्षाच्या प्रवासात पहिली दोन वर्षे इंटर कॉलेज स्पर्धा आणि पथनाट्य या मधून पूजा कला जोपासत होत्या. त्यानंतर नाटक या विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन, ललित कला केंद्र (गुरुकुल) मधून केले. या सगळ्या प्रवासात पूजा सामाजिक कार्यातही योगदान देत राहिली.

२०२४ या वर्षी पूजा ने  "आपली सोशल वाहिनी (आसोवा)" च्या टीम सोबत आणि समीर खांडेकर दिग्दर्शित "देवाक काळजी" वेब सीरिज चा भाग झाले. यात सिद्धी हे पात्र साकारले. ही वेब सीरिज कोकण प्रांतावर आणि तेथील गणेशोत्सव यावर आधारित असली तरीही ती एक विशिष्ठ सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धीच्या पात्रासाठी पुजा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या विभागात मानांकन' जाहीर झाले आहे. एक प्रतिभावंत गुणी कलावंत म्हणून पुजा यांनी छाप पाडली आहे.

पुजा यांचा जिवनप्रवास पाहता, पुजा यांच्या आईने आठव्या वर्षी पूजा यांना कथ्थक क्लास ला पाठवले. त्यानंतर ६ वी मध्ये असताना पूजा आणि तिची एक मैत्रीण दोघीजणी नाटुकल्या करायच्या. शाळेतले शिक्षक त्यांना अनेक वर्गांमधून फिरवायचे आणि नाटुकले सादर करायला लावायचे. त्यावेळीच गणिताच्या शिक्षकांना अभिनय येतो या विश्वासावर पूजाला बालनाट्य मध्ये सहभागी केले. तिथून पूजाची आणि अभिनयाची गट्टी जमली. मग हळू हळू घरचे सुद्धा अभिनयाबाबत किती हौशी आहेत हे कळले. पूजाचे बाबा स्वतः लेखक, नाटककार, अभिनेते आणि कवी आहेत. व्यवसायाने जरी बिल्डर असले तरी इतक्या वर्षांनी नाटकामध्ये अभिनय करण्यास त्यांनीही पुन्हा आणि नव्याने सुरुवात केली. त्यामुळे पूजाला या कामात प्रचंड पाठिंबा मिळाला.

अभिनय क्षेत्रात जो जो पाऊल टाकतो तो तो जोखीम हाती घेतो असं म्हणायला हरकत नाही. अनिश्चित अशा भविष्याला कवटाळायचे म्हणजे तहान भूक हरपून काम करावे लागते. आपल्या डोळ्यांसमोर खूप मोठे मोठे आदर्श असले तरी आपले नशीब या क्षेत्रात उजळेल का? हा प्रश्न सर्वांना पडतो. अभिनय करून आपण आपल्या मनाची भूक तृप्त करू शकतो, पण उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ह्याला बघताना तुम्हाला रिस्क आणि चाणाक्ष व्हावं लागतं. तिथून खरी सुरुवात होते. पण एक स्त्री म्हणून हा प्रवास इतरांसारखा नसतो. स्त्रियांच्या सौंदर्याला या क्षेत्रात कामाच्या संधी लवकर मिळून जातात पण तिथेच तुम्ही जर फार साधारण असाल तर तुमच्याकडे फक्त टॅलेंट आणि आत्मविश्वास ही तुमची ताकद होऊन जाते. पण काळ बदलतो, गोष्टी बदलतात, आशय बदलतो आणि अनुभव बदलतो ह्यावर पूजा यांचा विश्वास आहे आणि आता सौंदर्यासोबत अभिनयाला तितकेच महत्त्व प्राप्त होताना दिसते आणि ही खूप आशादायक गोष्ट पूजा यांना वाटते.

माणूस पाठिंब्याशिवाय काहीच करू शकत नाही. मनोधैर्य टिकवून ठेवायचे असेल तर तुम्हाला साथ ही लागते. दैवाने पूजाला दोन्ही गोष्टी या पुरेपूर मिळाल्या आहेत. पूजाचे कुटुंब आणि मित्रपरिवार उत्तम प्रकारच्या कलाकारांनी आणि माणसांनी भरलेला आहे, बळ द्यायचे काम ते नेहमीच करतात. पूजा यांचा मित्रपरिवार छोटा आहे. पण जो आहे तो पुरेसा आहे असे त्याम्हणतात.

कुटुंबामध्ये तर बाबा स्वतः साहित्यिक, कलाकार माणूस. त्यामुळे एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला चांगला ओळखू शकतो आणि मन ओळखू शकतो. आई सुद्धा आता सिनेमातून काम करते. त्यामुळे जिने पहिला डान्स क्लास लावला तिला पूजाच्या कला जीवनाबद्दल असलेली ओढ कळणार नाही असे होणे शक्य नाही. भाऊ तर पूजाने जेवढी स्वप्न बघितली नाही तेवढी स्वप्न तो बघतो त्यामुळे खरा आत्मविश्वास मिळतो. हे असं वातावरण आणि सपोर्ट असताना  अजून अभिनयातून जगासमोर येण्यासाठी बळ मिळते.

आपला पहिलं काम समोर आल्यावर पूजा यांना खूप धुक धुक असायची जी की सगळ्यांनाच असते. कितीही नाही म्हटलं तरी लोकांनी आपलं कौतुक करावं असं प्रत्येक कलाकाराला वाटतं आणि त्यात काही गैर आहे असं वाटत नाही. खूप वर्ष नाटक या क्षेत्रात काम करत आहे. हौशी राज्य नाट्य स्पर्धा, युथ फेस्टिवल, एकांकिका स्पर्धा पूजा ने केल्या. आता पूजा वेब सिरीज यात पदार्पण करते आहे. त्यामुळे  जे जे काम लोकांनी पाहिलं आणि जे स्वप्न पाहिलं होतं की  नाटकानंतर,  कामानंतर लोकं मला येऊन भेटतील, आपल्या अनुभवाबद्दल सांगतील तेव्हा  काय रिऍक्शन देऊ या बद्दल खूप विचार करायची, पण जेव्हा खरंच लोकं  भेटली तेव्हा  फक्त त्याचं ऐकावं, त्यांना काय वाटतं ते शांतपणे पाहावं आणि त्यांच्या आशीर्वादांना आपल्या मनात जागा द्यावी, हा एवढाच विचार मनात यायचा. वैयक्तिक समाधानाचे म्हणायचं झालं तर नेहमीच कलाकार म्हणून असमाधान मिळतं. आपल्याकडून अजून छान व्हायला पाहिजे असा नेहमीच वाटायचं. पण जी संधी मिळतेय लोकांपर्यंत पोहचण्याची आणि ती पदरात पाडून घेतेय ह्याचा नेहमीच आनंद व्हायचा.  चैतन्य स्फूर्ती होते. पण कलाकार कायम भुकेला का असतो ह्याचं कोडं अजून उलगडायचं आहे. असे पूजा सांगतात.

पूजाला लहानपणापासूनच बाबांकडून वर्ल्ड सिनेमाचा ठेवा मिळाला आहे.  लहानपणापासून पूजा ने बॉलीवूड इतकं बघितलंय की तिला तिचं आयुष्य जणू सिनेमाच वाटायचं. आणि जस जशी मोठी होत गेली तसं तसं युरोपियन सिनेमा, अमेरिकन सिनेमा, एशियन सिनेमा, इंडियन क्लासिकल फिल्म्स या वातावरणामध्ये तिने वेळ घालवला आहे. पूजाला सगळ्यात आवडता आणि प्रभाव असलेला अभिनेता म्हणजे इरफान. प्रभाव असलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. ज्येष्ठ लोकांपैकी शबाना आझमी, स्मिता पाटील, तब्बू, सुलभा देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, meryl streep, penelope cruz, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर इत्यादी, पण त्याबरोबरच आताचे कलाकार म्हटले तर पार्वती नावाची साऊथ इंडियन अभिनेत्री आहे, राधिका आपटे, दर्शना राजेंद्रन, तिलोत्तमा शोमे, सई ताम्हणकर इत्यादी कलाकार आवडते आहेत. यातले जे हयात आहेत  त्यापैकी एकासोबत तरी काम करायची संधी मिळावी असं स्वप्न पूजायांचे आहे. 

या क्षेत्रात संधी आहेत पूजासाठी कला हे तिचं जीवन आहे. काम हे अभिनय करणं आहे. जेव्हा ती काम करत नाही तेव्हासुद्धा सिनेमा, नाटक, पुस्तक वेगवेगळ्या प्रकारचे तत्त्वज्ञान तिच्या अवतीभवती असते. पूजाच्या अनुभवानुसार माणूस मोठा होताना कशासोबत मोठे व्हायचे आहे ह्याची नकळत निवड करतो आणि मोठा होतो. पूजा ने कला ह्या गोष्टीची निवड केली आणि ह्यातूनच लहानाची मोठी झाले त्यामुळे तिच्यासाठी हे फक्त करियर नसून तिला कला जिवंत ठेवते. जेवढे माणसे शिकवत नसतील तेवढे चित्रपट, नाटक आणि अभिनयातून आयुष्याला आणि समाजाला जाणते आहे.

सद्ध्या पूजा एका नाटकावर काम करतेय. आणि ते नाटक हल्लीच NCPA इथे सादर झाले. त्याच्या पुढच्या गोष्टींवर काम चालू आहे. इतर काही कामे हातात आहेत त्यांच्यावर संस्कार होत आहेत. पूजाला भविष्यात नाटक किंवा कॅमेरासमोर अभिनय करायचा आहे. उत्तमोत्तम प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत. ज्येष्ठ आणि दिग्गज लोकांसोबत छोटेखानी का असेना पण कामाचा अनुभव घ्यायचा आहे. तिला येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करायचे आहे.

जागतिकीकरण नंतर जग छोटे झाले आहे. आता तर ५ बोटात मावण्याइतके जग छोटे झाले आहे. भारतातल्या पिंगुळी मधली एक छोटी मुलगी युरोपियन सिनेमा बघू शकते, शिकू शकते तर जगातला कुठला तरी माणूस तिचे काम बघेल या आशेने काम करणार आहे. कुठेतरी कोणीतरी बाहेरच्या देशातला माणूस कामाकडे बघून वा म्हणेल तरी छान वाटेल. माझं काम लोकांना मनोरंजित करायचं आहे आणि ते माझ्याकडून होत असेल तर यापेक्षा वेगळी पावती कोणती? असं पूजा यांचे मत.

पुजा यांच्या मते, अभिनेत्याने फक्त अभिनय करणं एवढंच नव्हे तर त्याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, तात्त्विक आणि अवती भवती चे ज्ञान असणे त्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. महिलांनी फक्त शारीरिक रित्या जपणूक न करता शिक्षण आणि निरंतर काहीतरी पाहणे , वाचणे, लिहिणे आणि आपल्या comfort झोन च्या बाहेर जाऊन ज्ञात करून घेणे गरजेचे आहे. समकालीन लोक काय करू पाहतायत आणि काय करतायत ह्याबद्दल जाणून घेतले पाहिजे म्हणजे कलेचा आवाका वाढत जातो आणि विचार विस्तृत होतात.

पूजा यांना कले व्यतिरिक्त खाण्याची खूप आवड आहे. वेगवेगळ्या शहरात जाऊन खाद्यसंस्कृती चा अनुभव घ्यायची खूप आवड आहे.  ऐतिहासिक किंवा प्राचीन अशा ठिकाणी भेटी द्यायला खूप आवडतात. पूजाला वेगवेगळ्या लेखकांची आणि विषयांची पुस्तके वाचायला खूप आवडतात.

कामाच्या धकाधकीतून पूजा
सिनेमा पाहून. पुस्तक वाचून. तिच्या comfortable मित्रांसोबत गप्पा मारून. समुद्रावर जाऊन. ज्येष्ठ आणि दिग्गज लोकांच्या गप्पा ऐकून . त्यांचे किस्से ऐकून. आणि मांजराची मांजरांशी खेळून मूड रिलॅक्स करते.

विविध सन्मान प्राप्त पूजा यांना भविष्यातील सर्व वाटचालींसाठी स्काय न्यूज टुडे कडून खूप खूप शुभेच्या.

rapan bottom