Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

मोफत दिव्यांग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोफत दिव्यांग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

१८० दिव्यांग बांधवानी घेतला लाभ

कृत्रिम मॉड्युलर पाय बसविण्यासाठी पुणे येथे १९ एप्रिलला मोठे शिबीर

निलेश जोशी | कुडाळ : भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीने सेवा भरती सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या सहयोगाने आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस यांच्या सी.एस.आर. निधी अंतर्गत आज पावशी येथील शांतादुर्गा हॉल मध्ये मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १८० दिव्यांग बांधवानी याचा लाभ घेतला. या दिव्यांग बांधवाना सुमारे ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅप्लर मोफत दिला जाणार आहे. त्यासाठी आज त्यांची मापे घेण्यात आली.


या मोफत दिव्यांग शिबिराचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि भारतमाता प्रतिमाचे पूजन करून झाले. यावेळी व्यासपीठावर मनीष दळवी यांच्यासह भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचे विश्वस्त आणि केंद्र प्रमुख विनय खटावकर, जिल्हा शल्य शिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर, सेवा भारती जिल्हाध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद सवदत्ती, शिबीर प्रमुख श्रीकृष्ण शिरोडकर आदी उपस्थित होते.


उदघाटन सोहळा सुरु होण्यापूर्वीपासूनच उपस्थित दिव्यांग बांधवांची पायाची आणि हाताची मापे घेण्यात आली. या सर्व दिव्यांग बांधवाना १९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता पुणे येथे होणाऱ्या शिबिरात हे हात आणि पाय बसविले जाणार आहेत. त्यासाठी या दिव्यांग बांधवांची पुण्याला जायची यायची सोय मोफत करण्यात आली आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कुडाळ एसटी डेपोकडून चार एसटी बसने सुमारे २०० दिव्यांग बांधव पुण्याला जाणार आहेत. त्यांना पुन्हा कुडाळला आणून सोडलं जाणार आहे, तसेच येत्या १४ मे रोजी कुडाळ मध्ये दिव्यांग बांधवांसाठी हात बसविणायचे शिबीर देखील होणार आहे. अशी माहिती भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचे विश्वस्त आणि केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी यावेळी दिली.
सोहळ्याला मार्गदशन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, या दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा बँक सर्वतोपरी प्रयत्न करेल. अशी ग्वाही दिली. हे शिबीर आयोजित करून दिव्यांग बांधवाना मोफत सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. १४ मे रोजी जे शिबीर होईल ते जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रांगणात घ्यावे अशी सुचना देखील त्यांनी आयोजकांना केली.


शिबिराच्या आयोजनाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले. हे पाय हे जयपूर फूट पेक्षा थोडे वेगळे आणि चांगले असल्याने त्याचा दिव्यांग बांधवाना चांगला उपयोग होईल डॉ. पाटील म्हणाले. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरचा आनंद फार समाधान देऊन गेल्याचे त्यांनी सांगितले.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर यांनी या शिबिरासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचेच आभार मानले. एक चांगली संधी सिंधुदुर्गातल्या दिव्यांग बांधवांसाठी या निमित्ताने भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांनी उपलब्ध करून दिली. दिव्यांग बांधवांसाठी काम करणारे अनिल शिगाडे यांचे देखील म्हाडेश्वर यांनी विशेष कौतुक केले.
या काय्रक्रमाला जयेश खाडिलकर, बाळकृष्ण परब, सद्गुरू दादा, राजेंद्र पाटील, डॉ. संजय निगुडकर, अनिल शिंगाडे, अनिकेत वालावलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जोशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गुरुप्रसाद सवदत्ती यांनी केले. या मोफत दिव्यांग शिबिरासाठी जिल्हाभरातून सुमारे २०० दिव्यांग बांधव उपस्थित होते.

rapan bottom