Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

संतोष करलकर खून प्रकरणी संशयितांना न्यायालयीन कोठडी

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीत येथील संदीप करलकर खून प्रकरणी रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (४०) व शैलेश दत्ताराम करलकर (४३) या दोन सख्या भावांसह कामगार शामसुंदर वाड्येकर याला गुरुवारी कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता १५ दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तिन्ही आरोपीची आज पोलीस कस्टडी संपली होती. तपासात नवीन मुद्दा नाही असे तयासीक अंमलदार श्री गायकवाड यांनी सांगून तपास सुरु असल्याचे सांगितले.


संदिप करलकरच्या खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून निवती पोलिसांनी तिघांना अटक केली होती. कवठी येथील दादा करलकर यांच्या काजूच्या बागेत जाऊन संदिप करलकर याने काजू चोरले आणि वडिलांना व कामगाराला धमकावले होते ,यांचा राग मनात ठेवून दादा करलकर व शैलेश करलकर या बंधूंनी आपल्या कामगाराला सोबत घेत संदिप करलकर याला घरी जाऊन  जाब विचारला. यावेळी झालेल्या झटापटीत संदीप करलकर याला जबर मारहाण केली होती. त्यानंतर संदीप करलकरचा मृत्यू झाला होता. याबाबतची फिर्याद संदीप करलकर याचा भाऊ संतोष करलकर याने निवती पोलिस स्थानकात दिली होती. त्यानुसार निवती पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. निवती पोलीस ठाण्याचे अधिकारी भीमसेन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करीत शामसुंदर वाडयेकर, रामचंद्र उर्फ दादा करलकर व शैलेश करलकर याना संशयित म्हणून ताब्यात घेत अटक केली होती.


कुडाळ न्यायालयाने सुरुवातीला संशयीत श्यामसुंदर वाडयेकर याला ६ मार्च पर्यंत आणि नंतर रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर व शैलेश दत्ताराम करलकर या दोन सख्या भावांना देखील सहा मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना आज कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले.

rapan bottom