Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

शिवसेनेच्या वतीने ९ मार्चला कुडाळात 'जागर स्त्री शक्तीचा'

शिवसेनेच्या वतीने ९ मार्चला कुडाळात 'जागर स्त्री शक्तीचा'

महिलांसाठी विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : जागतिक महिला दिनानिमित्त कुडाळ - मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडी (सिंधुदुर्ग)च्या वतीने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी दुपारी २.३० ते रात्री १० या वेळेत, कुडाळ पोस्ट ऑफीस चौक नजिकच्या श्री सिंधुदुर्ग राजा मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.दीपलक्ष्मी पडते यांनी पत्रकार परिषदेत दिली.


कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत सौ. पडते बोलत होत्या. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, चांदणी कांबळी, रेवती राणे, अनघा रांगणेकर, राकेश नेमळेकर आदी उपस्थित होते.


सौ.पडते म्हणाल्या, आ.निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन एकलव्य न्यायच्या अध्यक्षा रेणूताई व्यास यांच्या हस्ते व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व फोंडाघाट सरपंच संजना आंग्रे उपस्थित राहणार आहेत.


महिला ढोल ताशा पथकाच्या ढोल वादनाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. महिलांसाठी पाककला स्पर्धा होणार आहे. खाद्य पदार्थ चिकन स्टाटर्स ही या स्पर्धेची थीम आहे. सहभागी स्पर्धकांनी पाककलेची कृती लिहून आणणे आवश्यक आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रत्येक सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहे. उखाणे स्पर्धाही होणार आहे. यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना चांदीच्या वस्तू बक्षिस स्वरूपात देण्यात येणार असून, प्रत्येक सहभागी स्पर्धकाला भेटवस्तू देण्यात येणार आहेत. निमंत्रित डान्सचा नृत्याविष्कार कार्यक्रम सादर होणार आहे. विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यात विशेष करून हाॅटेल खानावळ चालविणा-या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.


खेळ पैठणीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. यातील प्रथम क्रमांक पैठणी, द्वितीय क्रमांक सोन्याची नथ, तृतीय क्रमांक चांदीचा करंडा व प्रत्येक सहभागी स्पर्धकाला भेटवस्तू देण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार असून, यातील विजेत्या स्पर्धकांना चांदीचे नाणे बक्षिस देण्यात येणार आहेत. उपस्थित सर्व महिलांना सौभाग्यवान भेट हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात येणार आहे. खाऊगल्लीही असणार असून, यात शाॅपिंग स्टाॅल्स सहभागी होणार आहेत. सर्व महिला प्रेक्षकांसाठी लकी ड्राॅ असणार आहे. पाककला स्पर्धेसाठी सिद्धी शिरसाट व रचना नेरूरकर आणि उखाणा स्पर्धेसाठी चांदणी कांबळी व रेवती राणे यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी. तसेच सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख कुडाळकर व माजी जि.प.अध्यक्षा पडते यांनी केले आहे.

rapan bottom