Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय होऊ देणार नाही !

पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय होऊ देणार नाही !

पारंपरिक मच्छिमार आमचे प्रथम प्राधान्य

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडली स्पष्ट भुमिका

मुंबई : एलईडी लाईट मच्छीमारांना कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही . पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल आत नियमात राहून करणे आवश्यक आहे. त्याच्याबद्दल सदस्यांच्या भावना विचारत घेऊन चौकटीत राहून काम करू. मात्र पारंपरिक मच्छिमार आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर कोणत्याच पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही. अशी स्पष्ट भूमिका मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडली.


राज्यातील मच्छिमार बांधवांच्या सोसायट्यांची डिझेल परताव्याची रक्कम 119.98 कोटी रुपये डिसेंबर 2024 पर्यंत दिलेले आहेत. उर्वरित रक्कम पूर्णता वितरित केले जाईल. त्या संदर्भात वित्त मंत्री अजित दादा पवार यांच्या समवेत बैठकी ही झाली असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात सांगितले.
राज्यातील मच्छीमार बांधवांच्या सोसायट्यांना डिझेल परताव्याची रक्कम मिळाली नसल्याचा तारांकित प्रश्न आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, अमित साटम, यांनी उपस्थित केला होता.


या प्रश्नावर उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, आम्ही किनारपट्टीवरील आमदार डिझेल परताव्याला महत्व देणार आहोत. मी मत्स्य खात्याचा मंत्री झाल्यानंतर माझ्या सरकारने जास्तीत जास्त डिझेल परतावा मच्छीमार बांधवांना दिला. याचे मला समाधान आहे. 23.98 कोटी उर्वरित देय असलेली रक्कम वित्त मंत्रालयाला कळविण्यात आलेली आहे. येता काळात ती शंभर टक्के अदा केली जाईल.


पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैलांपासून आत करता येत नाही जे पर्सनेट धारक नियमात राहून मासेमारी करतात त्यांचा विचार केला जाईल. मात्र नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होणारच. असेही मंत्री नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान
या सर्वच विषयी अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या दालनात बैठक घेण्यात येईल. असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. आमदार मनिषा चौधरी यांनी या चर्चेत भाग घेतला.

rapan bottom