जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त आयोजन
मालवण : जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल ताशा पथक वर्धापन दिनाचे औचित्य साधून सौ. शिल्पा यतीन खोत मित्र मंडळ स्वराज्य संघटना, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाउंडेशन, वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग व एस. एस. पी. एम. पडवे हॉस्पिटल, स्वराज ढोल ताशा पथक मालवण व लायन्स क्लब, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ मार्च रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे हे शिबिर संपन्न होणार आहे.

हे शिबीर महिला, पुरुष, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी खुले आहे. मोफत आरोग्य तपासणी व आजार डिटेक्ट झाल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामध्ये हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी, कर्करोग तपासणी, प्रसूती आणि स्त्रीरोग तपासणी, नेत्र तपासणी, अस्थिरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा मोफत करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी शिल्पा खोत: ९४२२५८४६४१, अश्विनी आचरेकर : ९४२०३३८७४६, दीक्षा लुडबे: ८६०५६३५७४१, निकिता तोडणकर: ७५८८४७२८७६, महेश अंधारी : ९४२३०५१६३७, मुकेश बावकर : ९४२२०९६९०३ यांच्याशी संपर्क साधावा.

