Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कवी किशोर कदम लिखित बालविश्व काव्यसंग्रहाचे 15 मार्च रोजी प्रकाशन

कवी किशोर कदम लिखित बालविश्व काव्यसंग्रहाचे 15 मार्च रोजी प्रकाशन

कवी अजय कांडर, कादंबरीकार उषा परब, ॲड. विलास परब, कवी विठ्ठल कदम, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती

कणकवली : कणकवली येथील कवी तथा ओसरगाव प्राथमिक शाळा १ चे मुख्याध्यापक किशोर डी. कदम यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या बालविश्व या बालकाव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे शनिवार 15 मार्च रोजी सायं.४.३० वा. येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कादंबरीकार तथा कोमसपाच्या केंद्रीय कार्यकारणी सल्लागार उषा परब यांच्या हस्ते बालविश्व काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य- सांस्कृतिक कार्यकर्ते ॲड. विलास परब, कोमसापाचे वरिष्ठ कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग साहित्य संघाचे सचिव जेष्ठ कवी विठ्ठल कदम, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.


किशोर कदम हे साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील कार्यकर्ते असून निबंध आणि काव्य लेखन ते करत असतात. यापूर्वी प्रभा प्रकाशनातर्फे त्यांचे निबंध लेखनाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांचा बालविश्व हा बालकवितांचा काव्यसंग्रह प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या संग्रहाच्या सदर प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर, कादंबरीकार उषा परब, ॲड. विलास परब,कवी विठ्ठल कदम, कवी मधुकर मातोंडकर हे बालविश्व काव्यसंग्रहाबद्दल मांडणी करणार आहेत.बालविश्व बालकाव्यसंग्रहातील कविता किशोर कदम यांनी आजवर जपलेल्या बालविश्वाची प्रचिती देतात. साध्या सोप्या शब्दात लिहिली गेलेली ही कविता बालवाचक आणि त्यांच्या पालकांनाही प्रभावित करते.

बाल मनाचे भावनिक नाते ज्या भवतालाशी जोडले गेले आहे तो भवताल बालविश्व मधील कवितेच्या केंद्रस्थानी आहे. दुसऱ्या बाजूला बालपणाच्या जडणघडणीत ज्या निसर्गाशी आपण जोडलेले असतो तो निसर्ग आयुष्यभर सोबत कशी करतो याचा प्रत्ययही या कवितांमधून येतो. श्री कदम हे प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांचे नित्याचं जगणं बाल जीवनाशीच निगडित आहे. त्यामुळे बालकांचे भावनिक विश्व त्यांनी जवळून अनुभवलेले आहे. त्याचे सखोल चिंतन बालविश्व कवितेत प्रकटलेले दिसते. तरी या प्रकाशन सोहळ्याला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

rapan bottom