सहाय्यक मत्स्य आयुक्त यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर उपोषण तात्पुरते स्थगित
कारवाई झाली नाही तर मात्र तीव्र आंदोलनाचा इशारा
मालवण : सिंधुदुर्गच्या जलधि क्षेत्रात येतुन माशांची बेकायदशीरपणे लूट करणाऱ्या मलपी-कर्नाटकच्या हायस्पीड ट्रॉलर्सची शासन दरबारी याची नोंद घेऊन ज्या प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे त्या प्रकारे होत नाही. याकडे तात्काळ लक्ष वेधून वेगवान कारवाई करण्यासाठी सर्जेकोट बंदरात मत्स्य व्यवसाय खात्याच्या ताब्यात असलेल्या हाय स्पीड डॉलर्स वर आज मच्छिमार संघटनेचे प्रतिनिधी रविकिरण तोरसकर यांनी लाक्षणिक उपोषण केले. त्याची दखल घेऊन सहाय्यक मत्स्य आयुक्त यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर कर्नाटक येथील परप्रांतीय हाय स्पीड डॉलर्सच्या घुसखोरी संदर्भात सुरू केलेले हे लाक्षणिक उपोषण तोरसकर यांनी तूर्त स्थगित केले आहे.
सिंधुदुर्ग व महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर गेले कित्येक वर्ष मलपी कर्नाटक येथील हाय स्पीड ट्रॉलरची खुसखोरी होत आहे .त्यामुळे सागरी जैवविविधतेचे अतोनात नुकसान होत असून महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या तोंडचा घास पळून नेला जात आहे. या बेकायदेशीर मासेमारी संदर्भात मच्छीमारांच्या विविध संघटनांनी वेळोवेळी निवेदन ,उपोषण व आंदोलनाद्वारे आपला आवाज उठवला आहे. कर्नाटकातील या हाय स्पीड ट्रॉलरची मजल सागरी गस्त करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत गेली आहेत. तसेच लाखो रुपयांची स्थानिक मच्छीमारांची मासेमारी करण्याची जाळी या ट्रॉलर्सनी तोडून नेली आहे.
नुकताच मलपी येथील बेकायदेशीर मासेमारी करणारा हायस्पीड ट्रॉलर्स सिंधुदुर्गच्या सागरी जलधीक्षेत्रामध्ये मत्स्य खात्याने पकडला होता. त्यामध्ये सुमारे सहा टन मासे आढळून आले होते अशा प्रकारचे शेकडो ट्रॉलर्स सध्या सिंधुदुर्ग व उर्वरित महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालून झुंडीने येत दहशत निर्माण करीत आहेत .त्यांच्या या झुंडशाहीमुळे मच्छीमारांचे जीव पण धोक्यात आले आहेत .शासन दरबारी याची नोंद घेऊन ज्या प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे त्या प्रकारे होत नाही आहे. याकडे तात्काळ लक्ष वेधून वेगवान कारवाई करण्यासाठी सर्जेकोट बंदरात मत्स्य व्यवसाय खात्याच्या ताब्यात असलेल्या हाय स्पीड ट्रॉलरवर आज रविकिरण तोरसकर यांनी लाक्षणिक उपोषण केले.
दरम्यान सहाय्यक मत्स्य आयुक्त यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर कर्नाटक येथील परप्रांतीय हाय स्पीड डॉलर्सच्या घुसखोरी संदर्भात सुरू केलेले लाक्षणिक उपोषण श्री. तोरसकर तूर्त स्थगित केले आहे. अनुषंगिक विषयात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सिंधुदुर्ग यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी तात्काळ उपायोजनाबाबत म्हणजेच गस्ती नका व ड्रोनग्रस्त याबाबत चर्चा झाली सदर विषयात वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीचा पत्रव्यवहार मत्स्य आयुक्त यांनी केला व त्याप्रमाणे सदरच्या पत्रव्यवहाराची प्रत दिली. तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रतिनिधींनी येऊन उपोषणाच्या कारणांबाबत चर्चा केली. यानंतर श्रमिक मच्छीमार संघ अध्यक्ष छोटू सावजी , श्रमजीवी रापण संघ सचिव दिलीप घारे व उपस्थित मच्छीमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, तसेच उपस्थित पारंपारिक मच्छिमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर आचारसंहिता संपेपर्यंत उपोषण स्थगित करण्यात आले आहे.. तसेच श्रमिक मच्छीमार संघ अध्यक्ष छोटू सावजी यांनी तात्काळ कार्यवाही न झाल्यास आचारसंहितेनंतर मोठ्या आंदोलनाचे सूतोवाच सहा.आयुक्त यांच्याकडे केले. दरम्यान पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नोटीस बजावली तसेच ऊपोषणकर्ते यांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली.

