स्थानिक स्कुबा व्यवसायिकांचा एकमुखी निर्णय
पर्यटकांची स्कुबा पर्यटन सफर होणार अधिक सुरक्षित आणि लक्षवेधी
मालवण | प्रतिनिधी : सागरी पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या चिवला बीच येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक सुरक्षित आणि दर्जेदार पर्यटन सफर घडवण्याचा प्रयत्न येथील स्थानिक स्कुबा व्यवसायिकांचा आहे. यासाठी व्यवसायिकानी एकत्र येत स्कुबा सागरी सफर 'दर' निश्चिती करून अधिकाधिक सुरक्षित आणि दर्जेदार पर्यटन सफर पर्यटकांना घडवण्याबाबत एकमुखी निर्णय घेतला आहे.
कोकण किनारपट्टीवरील सागरी पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मालवण किनारपट्टीवर दर वर्षी लाखो पर्यटन भेट देतात. मालवण शहरातील चिवला बीच या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित आणि दर्जेदार सागरी पर्यटन सफर घडवण्यासाठी येथील स्कुबा व वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक सेवा देत असतात. पर्यटकांना अधिकाधिक सुरक्षित आणि दर्जेदार पर्यटन सफर घडवण्याचा प्रयत्न येथील स्थानिक स्कुबा व वॉटरस्पोर्ट्स पर्यटन व्यवसायिकांचा नेहमीच राहिला आहे. यासाठी पर्यटन व्यवसायिकानी एकत्र येत दर निश्चिती करून अधिकाधिक सुरक्षित आणि दर्जेदार पर्यटन सफर घडवण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेतला आहे.
यावेळी मनोज मेथर, स्वीटन सोज, विशाल गोवेकर, रोहित मेथर, जॉन्सान रॉडरिक्स यांसह स्थानिक स्कुबा गाईड जे समुद्रात उतरून पर्यटकांना सेवा देतात ते सर्व गाईड व व्यावसायिक उपस्थित होते.
स्कुबा एकच दर या ठिकाणी असला तर पर्यटकांमध्येही गैरसमज राहणार नाही. आणि निश्चित दरा मुळे सवेचा दर्जाही उच्चतम ठेवून सर्वोत्तम सेवा पर्यटकांना देता येईल. असेही उपस्थित व्यवसायिकानी सांगितले.

