मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण शहर अध्यक्ष पदी सागर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष धीरज परब यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मी माझ्या जबाबदाऱ्या एकनिष्ठेने व प्रामाणिकपणे पूर्ण करेन, असा विश्वास सागर जाधव यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

