मालवण : सिंधुदुर्ग मालवण सागरी किनारपट्टी भागात परराज्यातील हायस्पीड बोटिंचा धुमाकूळ सुरु आहे. राज्याच्या जलधी क्षेत्रात हे हायस्पीड मोठया संख्येने घुसखोरी करत आहेत. मासळीची लूट करत आहेत. तसेच स्थानिक मच्छिमारांनी समुद्रात टाकलेल्या मासेमारी जाळ्यावरून हे ट्रॉलर जात असल्याने जाळी तुटून जात आहेत. तसेच हे भलेमोठे हायस्पीड ट्रॉलर छोट्या बोटिंच्या अंगावर येण्याचे प्रकारही घडत असून त्यामुळेही भीतीचे वातावरण आहे.
मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी प्रशासकीय कारभरावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाराजी व्यक्त केली आहे. मच्छिमारांना आपला लढा लढवा लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

हायस्पीड बोटिंचा मालवण किनारपट्टीवर धुमाकूळ सुरूच
