Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

कुडाळ मध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

कुडाळ मध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

शस्त्र, नाणी, मोडी लिपी पत्र, खेळ यांची मांडणी

रणजित देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

निलेश जोशी | कुडाळ : शिवशंभू विचार मंचाच्या वतीने शिव विचार दर्शन अंतर्गत कुडाळ हायस्कूलच्या आरती प्रभू कलादालनामध्ये शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल आहे. या शस्त्र प्रदर्शनातून शिवकालीन गडकिल्ले छायाचित्रे, नाणी, विविध प्रकारची शस्त्रे, मोडी लिपीतील पत्र यांच्या मांडणीतून शिवकालीन वातावरण उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघ आयोजित या प्रदर्शनाचे उदघाटन स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी शिवछत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. शिव शंभो विचारमंचाचे अजयराज जगताप, रुपेश मोरे, पंकज भोसले, प्रमोद काटे, रामा नाईक, दत्ताराम साळुंके, घनःश्याम परब, साईप्रसाद मसगे यावेळी उपस्थित होते.


या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रे, शिवकालीन नाणी, मोडिलिपीतील पत्र, दस्तऐवज, शिवरायांच्या आरमाराची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्रकारांनी काढलेली चित्रे, शिवकालीन बैठे खेळ यांची मांडणी करण्यात आली आहे.


आताच्या पिढीला इतिहास समजावा, त्यांना दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी चांगले पाहायला मिळावे यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे शिव शंभो विचारमंचाचे अजयराज जगताप यांनी सांगितले. कुडाळ प्रमाणेच उद्या मालवण आणि नंतर दोडामार्ग येथे हे प्रदर्शन पहायला मिळणार असल्याचे श्री. जगताप म्हणाले.


या प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद लाभला. विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या सर्वांना आयोजकांनी फार माहिती देत शिवकाळाची सफर घडवून आणली. प्रदर्शनाला कुडाळ हायस्कुल आणि आरती प्रभू कलादालनाचे सहकार्य लाभले आहे.

rapan bottom