छत्रपती श्री शिवराय झाले नसते तर | व्याख्याते अभयराजे जगताप यांचे मालवण मध्ये उद्या व्याख्यान
विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल मालवण व शिवशंभु विचारमंच ठाणे यांचे आयोजन
मालवण : विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल मालवण व शिवशंभु विचारमंच ठाणे यांच्या वतीने शिवकालीन नाणी मोडी लिपीतील ऐतिहासिक दुर्मिळ पत्रे, इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांच्या छायाचित्रे यांचे प्रदर्शन शनिवार 26 ऑक्टोबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे सकाळी 10 ते 7 या वेळेत तर व्याख्याते अभयराजे जगताप यांचे 'छत्रपती श्री शिवराय झाले नसते तर…' हे व्याख्यान सायंकाळी 5:30 वा. आयोजित करण्यात आले आहे.
छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण नगरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या धगधगत्या इतिहासाची साक्ष असणारी शस्त्रास्त्रे शिवकालीन आणि मोडी लिपीतील ऐतिहासिक दुर्मिळ पत्रे त्याचबरोबर महाराजांच्या वैभवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायं. ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास लोकांना कळावा यासाठीच व्याख्याते अभयराजे जगताप यांचे 'छत्रपती शिवराय झाले नसते तर…' या विषयावरील व्याख्यान 26 ऑक्टोबर रोजी सायं. ५ :३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
तरी शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन बजरंग दल संयोजक श्रीराज बादेकर व बजरंग दल सहसंयोजक गणेश चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

