Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

कुडाळातील शिंदे गटाचा मेळावा म्हणजे बचत गटाचे स्नेहसंमेलन : हरी खोबरेकर

कुडाळातील शिंदे गटाचा मेळावा म्हणजे बचत गटाचे स्नेहसंमेलन : हरी खोबरेकर

मालवण : भाजपाच्या निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावेळी कुडाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेला मेळावा म्हणजे बचत गटांचे स्नेहसंमेलन होते का ? असा उपरोधिक टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी लगावला आहे. शिवसेनेचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद फक्त शिवसैनिकांच्या मनगटात आहे. ते मिंधे गटाच्या लोकांना पेलावणारे नाही. त्यामुळेच राणेनी शिव धनुष्य हातात घेताच त्यांना ते पेलवले नाही. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याची टीका देखील श्री. खोबरेकर यांनी केली आहे.

भाजपाच्या निलेश राणे यांनी विधानसभेच्या तिकिटासाठी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी आयोजित केलेल्या सभेला गर्दी जमवण्यासाठी बचत गटांच्या महिलांना निमंत्रित करण्यात आले होते. एकनाथ शिंदेंच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी काही अधिकाऱ्यांच्या मार्फत बचत गटांच्या महिलांना जबरदस्ती करण्यात आली होती. मेळाव्याला न आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कुडाळच्या सभेला बचत गटांच्या महिलांचीच गर्दी दिसून आली. त्यामुळे हा मेळावा म्हणजे बचत गटाचे स्नेहसंमेलन होते का ? असा प्रश्न पडला आहे.

या स्नेहसंमेलनात एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या हातात शिवधनुष्य दिला. त्यावेळी त्यांना तो पेलवता आला नाही. रामायणावेळी राक्षसांना देखील शिव धनुष्य उचलता आले नव्हते. ते उचलण्याची ताकद फक्त श्री रामात होती. वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या दहा वर्षात कुडाळ मालवण मतदार संघातील दहशत मोडून काढून येथे रामराज्य आणले. त्यामुळे शिव धनुष्य त्यांच्याच हाती शोधून दिसते. या उलट नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा येथून विजय झाल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

ठेकेदारी मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात बाऊन्सर आणले जाऊ लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवाळीत या राक्षसरूपी वृतीचा बिमोड करण्याचा निर्धार कुडाळ मालवणच्या जनतेने केला आहे. आपला विजय हा निश्चित असून शिवसैनिकांनी देखील गाफिल न राहता येत्या 20 ते 25 दिवसात जागृत राहून प्रचाराचे काम करावे, आणी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात फोफाऊ पाहात असलेल्या या राक्षसी वृत्तीला कुडाळ मालवणच्या वेशीबाहेर ठेवावे, असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले आहे.

rapan bottom