Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

आमदार वैभव नाईक यांची ३२ कोटींची मालमत्ता; ५ गुन्हे नोंद

आमदार वैभव नाईक यांची ३२ कोटींची मालमत्ता; ५  गुन्हे नोंद

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी आपला आगामी विधानसभेसाठी निवडणूक अर्ज दाखल केला. यामध्ये त्यांनी जंगम व स्थावर अशी एकूण ३२ कोटी ५८ लाख ३२ हजार ५९९ रू संपत्ती नमूद केली आहे. त्यांच्यावर जिल्ह्यातील तिन पोलिस ठाण्यात पाच फौजदारी खटले प्रलंबित आहेत. अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी या प्रक्रियेतील शुभारंभ आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. दाखल केलेल्या अर्जात त्यांनी आपल्या स्थावर व जंगल मालमत्तेचे विवरण दाखवले आहे यानुसार जंगम मालमत्तेमध्ये त्यांनी स्वतःचे नावे ७ कोटी ३१ लाख २ हजार २१५ रू. तर पत्नीच्या नावे ३ कोटी ९२ लाख ८३ हजार ८४ रू. तर सामायिक मालमत्तेपैकी ९ लाख ८६ हजार ७५४ रू एवढ्या मालमत्तेचे विवरण दाखवले आहे. यामध्ये फॉर्च्यूनर कार, स्कॉर्पिओ, जेसीबी या मालमत्तेचे ४३ लाख ३० हजार ९२४ रू. त्यांच्याकडे स्वतःकडे २८१ ग्राम सोने असून त्याची किंमत २२ लाख ६२ हजार ८५८ रू. तर पत्नीकडे ४११ ग्राम सोने असून त्याची किंमत ३४ लाख ९७ हजार १२२ रुपये आहे. त्यांना पत्नी व स्वतःचे नावाने ९१ लाख ७० हजार ३८१ रू कर्ज आहेत. तर स्थावर मालमत्तेमध्ये स्वतःच्या नावे शेतजमीन, घर अशा स्वरूपाच्या मालमत्तेचे ११ कोटी ३९ लाख , ८० हजार ३०० रू तर पत्नीचे नावे २ कोटी ५२ लाख ५१ हजार, तर सामायिक मालमत्तेत ७ कोटी ६० लाख रुपये एवढी मालमत्ता आहे. आम .वैभव नाईक यांच्यावर एकूण पाच प्रलंबित फौजदारी खटले आहेत. यामध्ये कुडाळ पोलीस स्टेशन येथे ३, कणकवली पोलीस ठाण्यात १ तर मालवण पोलीस ठाण्यात एक अशा ५ फौजदारी खटल्यांचा समावेश आहे अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

rapan bottom