Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची कुडाळ आणि सावंतवाडी मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची कुडाळ आणि सावंतवाडी मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट

स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष, नामनिर्देशनबाबतच्या तयारीचा घेतला आढावा

निलेश जोशी | कुडाळ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी २६९- कुडाळ आणि २७०- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीचे नियोजन, गृह मतदान, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, पोस्टल बॅलेट मतदान नियोजन, स्ट्राँग रूम आणि मतमोजणी कक्ष तसेच नामनिर्देशनबाबतच्या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला. श्री पाटील यांनी सावंतवाडी शहरातील २ मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत निर्देश दिले. यावेळी २७० -सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील, ओंकार ओतारी आणि अमोर पवार उपस्थित होते.


कुडाळ उपविभागीय कार्यालयामध्ये देखील मतदान प्रक्रीयेचा संपूर्ण आढावा त्यांनी घेतला. येथील बैठकीनंतर श्री पाटील यांनी स्ट्राँगरुमला भेट देऊन मत मोजणी केंद्राची देखील पाहणी केली. यावेळी २६९- कुडाळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे, श्रीमती वर्षा झाल्टे, शितल जाधव उपस्थित होते.

rapan bottom