मालवण : मालवण कुडाळ तालुक्यातील शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
युवासेना महाराष्ट्र सचिव किरण माळी यांच्या हस्ते युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र पदाधिकाऱ्यांना सावंतवाडी येथील युवासेना कार्यक्रमांत सुपूर्द करण्यात आले.
दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या मालवण कुडाळ तालुक्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकिय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा. असे नियुक्तीपत्र सर्वांना देण्यात आले.
नियुक्ती जाहीर केलेले पदाधिकारी
कुडाळ - मालवण विधानसभा अध्यक्ष प्रीतम गावडे, कुडाळ - मालवण जिल्हा सचिव संतोष मुळेकर, कुडाळ मालवण उप विधानसभा अध्यक्ष अभिषेक कांदळगावकर, मालवण तालुकाध्यक्ष तथागत मालवणकर, आचरा मालवण उपतालुका अध्यक्ष प्रवरण परब, कुडाळ तालुका उपाध्यक्ष आदित्य राणे, कुडाळ शहर अध्यक्ष गौरव पिंगुळकर, तळाशिल आचरा मालवण विभाग अध्यक्ष गौरव मालंढकर, मालढी मालवण विभाग अध्यक्ष दशरथ पराडकर, देवबाग विभाग अध्यक्ष सुयोग तांडेल, आचरा मालवण उपविभाग अध्यक्ष विनायक कोळंबकर, देवबाग शाखाध्यक्ष पांडुरंग खराडे, देवबाग शाखा उपाध्यक्ष नितीन बांदेकर, युवासेना उप जिल्हा प्रमुख विदेश पाटकर, युवती सेना उप जिल्हाप्रमुख सोनाली मुळेकर, युवतीसेना तालुका प्रमुख मालवण शहर विद्या पाटकर, युवतीसेना तालुका प्रमुख मालवण आचरा स्मिता करंजे, युवती सेना तालुका प्रमुख कुडाळ गायत्री गोलम यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग माजी सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, कणकवली विभाग जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, सावंतवाडी जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

