Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

प्रा. नागेश कदम यांच्या 'इथे निबंधांचिये नगरी' पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

प्रा. नागेश कदम यांच्या 'इथे निबंधांचिये नगरी' पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मालवण : सातारा जिल्ह्यातील हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय विविध साहित्यकृतींच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, या स्पर्धेत मालवण येथील सुनीता देवी टोपीवाला डी.एड. कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या 'इथे निबंधांचिये नगरी' या निबंधलेखन पुस्तकास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

प्रा.नागेश कदम हे जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक असून निबंधलेखन म्हणून परिचित आहेत. निबंधलेखनाबरोबरच कवी, कथाकार, एकांकिका लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच बालभारती पुणे, अभ्यासक्रम समिती, विषय समिती यावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यशदा पुणे संचलित जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसाठी ते तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून काम करतात.

प्रा. नागेश कदम यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे, प्राचार्य हेमंत प्रभू सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

rapan bottom