मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण
निलेश जोशी | कुडाळ : खरं म्हणजे आजचा दिवस शिवसेनेसाठी आणि कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. निलेश राणे आज स्वगृही परतले आहेत. हातात धनुष्यबाण घेतला आहे. खर म्हणजे मी म्हणेन एक प्रकारची घरवापसी आहे आणि यासाठी मी निलेश राणे यांचा मनापासून अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांचे शिवसेनेत स्वागत केले. त्यांनी खासदार नारायण राणे यांचे देखील या प्रवेशाला परवानगी दिल्याबद्दल आभार मानले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आजच्या या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि निलेश राणे यांच्या आजच्या या शिवसेना प्रवेशामुळे कुडाळमालवण या भागामध्ये शिवसेना म्हणजे महायुतीची ताकद एक प्रकारे वाढलेली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे याना कुडाळमधून २६ हजाराचे लीड होते. मला विश्वास वाटतोय तुम्ही एवढा वेळ आज या ठिकाणी थांबलेला आहात यावरून माझा विश्वास डबल झाला आहे की हे २६ हजाराचं लीड ५२ हजार झाल्याशिवाय राहणार नाही.
अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार या राज्यात काम करत होती. मी देखील त्या सरकारमध्ये होतो. परंतु काय कारभार होता ? किती कामांना स्थगिती होती ? किती कामाला ब्रेक लावला होता? सगळं ठप्प होते. २०१९ ला आपण सर्वांनी या राज्यामध्ये शिवसेना भाजपा युतीचे सरकार आलं पाहिजे म्हणून मतदान केलं. त्याचा विश्वासघात आणि आपल्या मतांची बेइमानी त्यांनी केली आणि म्हणून दोन सव्वा दोन वर्षांपूर्वी या एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि या राज्यात महायुतीच सरकार आणलं. चालू सरकार आम्ही सोडलं. लोक सरकारच्या बाजूने जात असतात आम्ही सरकारच्या विरुद्ध दिशेने गेलो. कारण बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले तत्व सोडली शिवसेनेचे विचार वैचारिक भूमिका सोडले फक्त केवळ खुर्ची आणि सत्तेसाठी आणि त्यामुळे आम्ही त्या सत्तेपासून दूर गेलो लांब गेलो.
त्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आलं पाहिजे ही भावना ओळखून आम्ही जे काम केले. परंतु बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेइमानी केली, त्यांचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेमध्ये आले आहेत. . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोनदा पराभूत करणाऱ्या काँग्रेस समोर गुडघे टेकले त्यांचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले आहेत. कोकणाच्या विकासात कायम खोडा घालणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी निलेश राणे शिवसेनेमध्ये आले आणि त्याचबरोबर विरोधकांना देखील चारी मुंड्याचीच करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेमध्ये आले आहेत. आणि त्याचबरोबर कुडाळ मालवणचा विकास करण्यासाठी देखील निलेश राणे शिवसेनेमध्ये आले आहेत. मी त्यांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. येथील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे चित्र आज आपण पाहतोय. एवढा वेळ कोण थांबतं ? एवढा वेळ कोणाला पडली आहे ? परंतु राणेसाहेबांवर आपण जे प्रेम करतात त्या प्रेमाची या ठिकाणी पोचपावती तुम्ही दिलेली आहे. खऱ्या अर्थाने एवढे कार्यकर्ते यांच्या प्रचारात उतरले तर समोरच्याचा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
निलेश आपल्याच मित्रपक्ष भाजपातून येतोय. नितेश आणि राणेसाहेब भाजपमध्ये आहेत. आमच्या वैचारिक भूमिका सारख्या आहेत आणि म्हणूनच आजचा प्रवेश ऐतिहासिक आहे. तीस वर्ष एका विचाराचे राजकारण आम्ही केलं आणि मराठी माणसांचं रक्षण करणं हिंदुत्वाचे रक्षण करणे या राज्याचा विकास करणं हाच आमचा अजेंडा आहे. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत आणि मला काय मिळालं, माझं काय यापेक्षा माझ्या राज्यातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत. म्हणून हा फरक आहे.
कोकणा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेबांच्या आदेशावर जीवाला जीव देणारी कोकणी माणसं राणे साहेबांनी घडवली आहेत. त्यांचा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पर्यंत प्रवास संघर्ष आम्ही पाहिलेला आहे. कार्यकर्ता कसा जपायचा तर ते नारायण राणे साहेबांकडून शिकायचं. म्हणून आज या ठिकाणी शिवसेना वाढली आहे. लोकसभेत राणे साहेबांना तुम्ही विजयी केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे कोकणात त्या काळात शिवसेना वाढवण्यामध्ये राणे परिवारचा मोठा वाटा आहे. नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही. परंतु या ठिकाणी एवढेच सांगतो की शिवसेनेत कधीच फाटाफूट झाली नसती तर शिवसेनेला आव्हान देणारा कोणताच पक्ष नसता. पण या ठिकाणी का केलं कशासाठी केलं त्या वृत्तीमुळे म्हणजे स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नाही अशी लोक अशी माणसं तिथे होती. नारायण राणे असतील राज ठाकरे असेल किंवा अनेक लोक आहेत आणि मी माझ्यासोबत 50 आमदार आज शिवसेनेतून बाहेर पडले. का पडले, सत्ता सोडली. त्याचं कारण शिवसेनेतून नाही शिवसेना सोबत नेली. धनुष्यबाण आम्ही वाचवला आणि शिवसेना वाचवली. शिवसैनिकांचा खच्चीकरण आम्ही वाचवलं आणि म्हणून आज या सरकारमध्ये सर्व सामान्य माणसाला आज न्याय देण्याचा काम आम्ही करतोय.
त्यावेळेस सगळे लोक दिल्ली पासून कुठूनही मातोश्रीवर यायचे. आज याना दिल्लीतल्या गल्ली गल्ली मध्ये फिरावे लागते आहे. मला करा मला करा माझा चेहरा करा असे सांगावे लागते आहे. त्यांचा चेहरा जर त्यांच्या मित्र पक्षांना चालत नाही ते महाराष्ट्रातील जनतेला कसं चालेल? असा सवाल करून एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही मला काय मिळेल यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल या सर्व सामान्य जनतेला काय मिळेल हे पाहणारे आहोत. लोकसभेत १३ जागेवर आम्ही समोरासमोर लढलो. धनुष्यबाण आणि मशाल. १३ पैकी सात जागा धनुष्यबाणाने जिंकल्या. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करत आहोत.
राणेसाहेबांच्या मी सोबत काम केलं आहे. त्यांचं काम मी पाहिलेला आणि म्हणून ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारे लोक आम्ही आहोत. या ठिकाणी आज राज्यांमध्ये जर पाहिलं तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही मूळ युती गेल्या तीस वर्षापासून काम करते आहे. मी आपल्याला सांगतो की ज्याने बाळासाहेबांचे विचार सोडले आणि ज्यांनी वेगळी भूमिका घेतली, या निवडणुकीत त्यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. खर म्हणजे कोकणातल्या भूमीने एका हातात धनुष्यबाण एका हातात कमळ उचलले आहे. पुन्हा या ठिकाणी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही एकच काम केलं सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्वसामान्य माणसाला काय मिळालं पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून देशाचे लोकप्रिय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा सबका साथ सबका विश्वास सबका विकास हा मंत्र आम्ही या राज्यांमध्ये डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुढे नेतोय याचा देखील मला आनंद आणि समाधान आहे.
अनेक प्रकल्प आपण पूर्ण केले आणि त्याचबरोबर अनेक कल्याणकारी योजना या ठिकाणी आपण सुरू केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली. पण हे सरकार येथेच तुम्हाला थांबवणार नाही. तुम्हाला हे सरकार माझ्या सर्व सामान्य कुटुंबातल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. लाडक्या भावासासाठी आठ हजार दहा हजार स्टायपेंड दिला. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. एक मुलीने आत्महत्या केली. 50% पण ती फी भरू शकत नव्हती म्हणून आत्महत्या केली. माझ्या राज्याच्या सर्वसामान्य मुलींना उच्च शिक्षण घ्यायचा असेल तर त्यांना शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी योजना केली. साडेसात एचपीची कृषी पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. खूप निर्णय घेतला. . त्या निर्णयामध्ये मी जात नाही परंतु राणे साहेबांनी देखील त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांच्या पायावर उभे केले आहे.
निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे खऱ्या अर्थाने विकासाला चालना देण्याचे काम आपण करतोय. एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई गोवा सिंधुदुर्ग असा समृद्धी एक्सप्रेस सारखा हायवे सरकार करतेय. त्याचा आता डीपीआर आणि टेंडरिंग झाली आहे. भविष्यात निलेश राणे यांच्या माध्यमातून या कोकणाचा बॅकलॉग आपण भरून काढणार आहोत आणि म्हणून विकास हाच आपला महत्त्वाचं अजेंडा आहे. आपण राणे साहेबांच्या नितेश राणेंच्या पाठीशीजसे राहिला तसेच निलेश राणेच्या पाठीशी देखील खंबीरपणे उभे रहा. एकनाथ शिंदे आपल्यासाठी एवढेच सांगतो की आणि जे अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार दोन सव्वा दोन वर्षाचं महायुतीचा सरकार या दोघांच्या कामाची तुलना करा. आम्ही हे काम घेऊन जनता जनार्दनाच्या दरबारात जाऊ आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. मला विश्वास आहे दोन सव्वा दोन वर्षात केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकांमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला.

निलेश राणेचे स्वगृही परतणे हा ऐतिहासिक क्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
