Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

माझी स्पर्धा स्वतःशी… कुठल्या आमदारांशी नाही - निलेश राणे

माझी स्पर्धा स्वतःशी… कुठल्या आमदारांशी नाही - निलेश राणे

निलेश राणे उद्या करणार शिवसेनेत प्रवेश

पत्रकार परिषदेत दिली माहिती

महायुतीच्या फार्म्युल्यानुसार पक्षप्रवेश ; भाजपबद्दल नेहमी प्रेमाचं !

निलेश जोशी | कुडाळ : मी काय मिळवायला आलेलो नाही. माझा मतदार संघ चांगला करावा, हाच विचार माझ्या डोक्यात आहे. माझी स्पर्धा कुठल्या आमदारांशी नाही, मी त्यांच्यावर टीकाही करणार नाही, टीका करायची गरज सुद्धा नाही. माझी स्पर्धा ही माझ्याशी आहे. मी उद्या या मतदारसंघाला चांगले कसे करू शकतो. महाराष्ट्राच्या नकाशावर हा टॉप 5 मध्ये हा मतदारसंघ कसा येईल हाच विचार माझ्या डोक्यात असतो. असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले. निलेश राणे हे उद्या 23 ऑक्टोबर रोजी कुडाळमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थतीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. अशी माहिती निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हे सगळे पक्षीय धोरण असल्याचे सांगून निलेश राणे यांनी भारतीय पक्षासोबत आपले नेहमीच चांगले संबंध राहणार असल्याचे स्पष्ट केले. जेव्हा आपण अलायन्समध्ये असतो तो अलायन्सच्या प्रोटोकॉल नुसार फॉर्मुलानुसार आपल्याला काम करावे लागते. असेही राणे यांनी यावेळी सांगतिले.


यावेळी निलेश राणे म्हणाले, 2019 ला राणे साहेबांसोबत, नितेश राणे सोबत आणि आमच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांना घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षात आलो. भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर खूप रिस्पेक्ट मिळाला. सगळ्या नेत्यांनी खूप रिस्पेक्ट दिला. खूप आधार दिला. खूप प्रेम दिलं आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची जी शिस्त आहे ती शिकायला मिळाली. ती जवळून बघितली. फडणवीस साहेबांनी तर एका लहान भावाप्रमाणे मला सांभाळले. काहीवेळा ज्या काय अडचणी आल्या त्यामधून मला बाहेर काढले. पक्षांमध्ये एक स्थान दिले. तसेच रवींद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या सगळ्या नेत्यांनी आणि अशा असंख्य नेत्यांनी साथ दिली. माझे अनेक जीवाभावाचे संबंध या पक्षात आजही आहेत, पुढेही राहतील आणि इतक्या वर्षाच्या या राजकारणामध्ये जेव्हापासून सुरुवात झाली त्यापासून राणे साहेबांच्या सावलीमध्ये ते जसे बोलतील जे बोलतील कधी प्रश्न न विचारता मी त्यांच्याबरोबर राहीलो.


उद्या 23 तारखेला चार वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी यांची कुडाळ हायस्कूल ग्राउंड वर माझ्या शिवसेना प्रवेशाची सभा होणार आहे. तो प्रवेश उद्या नक्की झालेला आहे त्यासाठी मी शिंदे साहेबांचाही मनापासून आभार व्यक्त करतो.
जेव्हा आपण अलायन्समध्ये असतो तो अलायन्सच्या प्रोटोकॉल नुसार फॉर्मुलानुसार आपल्याला काम करावे लागते. या मतदारसंघांमध्ये मी अनेक वर्ष काम करतोय. आम्ही लोकसभेला ह्याच मतदारसंघांमध्ये 27 हजारची लीड घेतली. 90 टक्के ग्रामपंचायती आम्ही घेतल्या. खरेदी-विक्री संघ आम्ही घेतले. बाजार समिती आम्ही घेतल्या. कृषी सोसायटी आम्ही घेतल्या. खासदारकी पण आम्ही जिंकलेली आहोत. महायुतीमध्ये आम्ही या सगळ्या निवडणुका जिंकल्या आणि आता येणारी विधानसभा ही पण आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आम्ही एका टीमवर्कमध्ये हे आम्ही निवडणूक जिंकणार आहोत हेच सांगण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित केलं होतं.


नेत्यांनी ठरवलेला हा विषय आहे आणि एका गोष्टीचा आनंद आहे समाधान आहे की राणे साहेबांची सुरुवात ज्या पक्षातून झाली ज्या चिन्हावरून झाली. आज मला त्याच चिन्हावर काम करायची संधी मिळणार आहे. तसेच शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मला मिळणार आहे. या गोष्टीचा खरोखर आनंद आहे समाधान आहे. पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये जे काय माझे संबंध राहिले आहेत, पुढेही राहतील त्याच्यामध्ये कधीच काही बदल होणार नाही.


एका प्रश्नाला उत्तर देताना निलेश राणे म्हणाले, नेहमी तुमच्या मनात वेगळं असते आणि माझ्या मनात वेगळं असते पण तसे काही नाही. निवडणूक जिंकायची हे आमचे टार्गेट आहे आणि त्या टार्गेटवरच मी नेहमी लक्ष केंद्रित करत आलो आहे. मी राजकारणामध्ये प्रोटोकॉल आणि शिस्त पाळणारा माणूस आहे. म्हणून आपले टार्गेट काय ते अगोदर आपण ताब्यात घेतले पाहिजे. ते मिळविले पाहिजे. माझ्या सध्या तरी डोक्यात तेवढेच आहे. आम्ही कुठेही तर नेहमी बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवतच असेल. काँग्रेसमध्ये जेव्हा होतो तेव्हाही बाळासाहेबांना कधी विसरलेलो नव्हतो. बाळासाहेब हे नेहमी आमचे दैवतच राहिले आणि राहणार. पण फक्त काही राजकीय निर्णय तेव्हाच्या तेव्हा बदलत गेले.


मी काय मिळवायला आलेलो नाही. माझा मतदार संघ चांगला करावा, हाच विचार माझ्या डोक्यात आहे. माझी स्पर्धा कुठल्या आमदारांशी नाही, मी त्यांच्यावर टीकाही करणार नाही, टीका करायची गरज सुद्धा नाही. माझी स्पर्धा ही माझ्याशी आहे. मी उद्या या मतदारसंघाला चांगले कसे करू शकतो. महाराष्ट्राच्या नकाशावर हा टॉप 5 मध्ये कसा मतदारसंघ येईल ही माझी स्पर्धा आहे. कुठेतरी नाव करणे, हवा करणे हा भाग नाही. आपला मतदारसंघ जो मागच्या दहा वर्षांमध्ये एक ओळख विसरून बसलाय स्वतःची ती ओळख परत निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न आहे. बाकी मला काय हवंय ? मी खासदार झालेलो आहे. माझ्या घरात अनेक वर्ष लाल दिवा आहे. होता. म्हणून कुठल्या लाल दिव्यासाठी किंवा वेगळ्या गोष्टीसाठी माझे प्रयत्न नाहीत. 21 व्या शतकातला हा मतदारसंघ वाटला पाहिजे असं काहीतरी माझ्या हातातून घडून दाखवाव हाच फक्त उद्देश आहे. असे श्री. राणे म्हणाले.
पक्ष हितासाठी जे करणं गरजेचे आहे ते मी करणार. आज तुमच्यासमोर आक्रमकता दाखवून काहीच उपयोग नाही. जिथे दाखवायची गरज आहे तिकडेच दाखवावी लागते आणि ते स्वतःहून बाहेर पडते. त्याच्यासाठी वेगळा कोर्स करावा लागत नाही. ते रक्तात असते. आणि म्हणून मला मला वेगळे पक्षाला काही सांगायची गरज नाही. पक्षाला त्या सगळ्या गोष्टींची माहिती असावी आणि पक्ष ती माहिती घेत असतात. निलेश राणे उद्याचा कधीच विचार केला नाही. आक्रमकता हा माझा मूळ स्वभाव आहे. मी कुठे मी आक्रमक आहे असे दाखवायचा कधी प्रयत्न करत नाही. जसे मुळात आहे, रक्तात आहे तसे मी वागायचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येक माणूस आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो. उद्या हळद लागणार आहे. जिथे साहेबांची सुरुवात झाली त्या चिन्हावर मला काम करायची संधी मिळते आहे, तर मला समाधान आहे. आनंद आहे.


उद्या भरगच्च कार्यक्रम होणार आणि प्रेमापोटी त्यांना यायचे ते सगळे येणार आणि कुडाळ मध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधी झाला नसेल तेवढा मोठा कार्यक्रम होणार. सगळी तयारी आता झालेली आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. तुम्ही नेत्यांना विचारायचे प्रश्न मला नका विचारू मला निवडणूक जिंकायची आहे. तुम्ही सोबत रहा. आपल्याला निवडणूक जिंकायची आहे. आता बाकी काय आज नको. असे निलेश राणे यांनी शेवटी सांगितले.

rapan bottom