Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

नामनिर्देशन पत्र 22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत स्विकारले जाणार

नामनिर्देशन पत्र 22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत स्विकारले जाणार

सिंधुदुर्ग : भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 269 कुडाळ विधानसभा मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालायवीत सकाळी 11 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ यांच्या दालनात स्विकारली जाणार आहेत.
        निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नामनिर्देशनपत्रे भरतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी 269 कुडाळ विधानसभा मतदार संघाचे कार्यालयाच्या 100 मीटरच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रक दाखल करणाऱ्या इच्छूक उमेदवार किंवा त्यांच्या सोबतच्या व्यक्तींच्या वाहनाची संख्या जास्तीस जास्त 3 एवढी निश्चित करण्यात येत आहे. नामनिर्देशन पत्र भरतेवेळी उमेदवारासह 5 व्यक्तींना निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येत आहे. दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 100 मीटरच्या परिसरात कुठलीही खाजगी आस्थापना सुरु ठेवू नयेत.  नागरीकांनी/अभ्यागतांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या 100 मीटर मधील शासकीय व खाजगी कार्यालयातील कामे अत्यावश्यक नसल्यास वरील दिवशी व वेळेत शक्यतो टाळावीत. अभ्यागतांचे संबंधित कार्यालयाकडे काम जर अत्यावश्यक असेल तर पोलिस विभागाने निश्चित केलेल्या पार्किंग क्षेत्रामध्ये स्वतःकडील वाहन पार्क करुन संबंधित कार्यालयाकडे पायी यावे.
           निवडणूक सारखी संवेदनशील बाब असल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी अनावश्यक नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी सदरची बाब करणेत आलेली आहे. जेणेकरुन प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची देखील कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. वैद्यकीय आपत्कालीन सेवा व इतर आपत्कालीन सेवेतील वाहनांना याबाबत मुभा देण्यात आलेली असून रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली वाहने पोलिस विभागाने निश्चित केलेल्या पाकींग क्षेत्रात पार्क करुन रुग्णालयात जाण्याचे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय व परिसर सी.सी.टी.व्ही.च्या निगराणीत घेण्यात आलेला असून आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार व नागरीकांनी घ्यावी.
०००००

rapan bottom