पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे प्रवेश
सहकारीही मोठ्या संख्येने उपस्थित
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर अभ्यासू व निर्भीड व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी आज मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचे सहकारी उपस्थिती होते.

यात मालवण मनसेचे माजी तालुकाप्रमुख विनोद सांडव, बाबल गावडे, आशिष सुभेदार, दीपक गावडे, मंदार नाईक, संदिप लाड, राजेश टंगसाळी, आप्पा मांजरेकर, सचिन मयेकर, नाना सावंत, आबा चिपकर, विजय उपरकर, प्रणव उपरकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपरकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संग्राम प्रभुगांवकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

