Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांची मालवण व पेंडूर-कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे भेट

आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांची मालवण व पेंडूर-कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे भेट

केंद्रीय कॉमन रेव्ह्यू मिशन पथक पुढील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर : या पार्श्वभूमीवर आढावा

मालवण : आरोग्य विभाग केंद्रीय कॉमन रेव्ह्यू मिशन (केंद्रीय आरोग्य पथक) पुढील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने त्याची पूर्वतयारी व आढावा घेण्यासाठी कोल्हापूर विभाग आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी मालवण व पेंडूर- कट्टा ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन आढावा घेतला. मालवण व पेंडूर ग्रामीण रुग्णालयात सुमारे 500 च्या वर डायलिसिस रुग्णांना सेवा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांचे स्वागत केले.

इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, असंसर्गिक कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम, लसीकरण कार्यक्रम, औषध पुरवठा, रिक्त मनुष्यबळ, आयुष्मान भारत, गोल्डन कार्ड, आभा कार्ड, क्षयरोग व लेप्रसी तसेच हत्तीरोग मलेरिया, डेंग्यू व इतर साथीच्या आजारांबाबत आढावा घेतला.
औषध साठा सुसज्ज ठेवणे, प्रसुती सेवा वाढविणे, रुग्णालयातील अंतर्गत व बाह्य परिसर अधिक स्वच्छता ठेवण्याबाबत सूचना दिल्या.

ग्रामीण रुग्णालय पेंडूर येथे संभाव्य क्रिटिकल केअर युनिटच्या जागेबाबत पाहणी केली. मालवण ग्रामीण रुग्णालय श्रेणी वर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्या संदर्भात येत असलेल्या जागा व इतर अडचणी संदर्भात इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालया धरती वर अडचणी सोडवणे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करणे, व पेंडुर् कट्टा येथे प्रस्तावित डायलिसिस युनिट, NUHM अन्तर्गत नागरी आशा, अर्बन हेल्थ सेंटर इत्यादी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. जिल्हा शल्यचिकि्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैदयकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, जिल्हा फार्मा ऑफिसर अनिलकुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही ग्रामीण रुग्णालये आरोग्य सेवेच्या माध्यमातून चांगली वाटचाल करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.

संभाव्य निवडणूक कार्यक्रम, केंद्रीय कॉमन रिव्ह्यू मिशन जिल्हा दौरा लक्षात घेता कर्मचारी यांना काही सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. स्वप्निल बोधमवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे, विस्तार अधिकारी सूरज बांगर, श्री. रणसिंग, श्री. कुमार म्हावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल गंडाले, डॉ सुजित मोंडकर, डॉ. आदिल, डॉ. विजय वेरुलकर, डॉ. मेहेंदळे, डॉ. सौ. गावकर, डॉ. वैभव गावकर, डॉ. सौ जागृती ढोके, अधीपरीचारिका सौ. संतोषी देसाई, सौ. सावंत, सौ. कुबल, सौ. कदम, सौ. रणदिवे, हेमांगी, आरोग्य सहाय्यक कोरडे, विनायक सावंत, वरिष्ठ सहाय्यक सौ. मीनल वस्त, श्रीमती तळावडेकर, क्ष किरण तंत्रज्ञ केळुस्कर, सौ. कोरडे, फार्मा ऑफिसर रघुवीर नकाशे, सौ. बारटक्के, लॅब टेक्निशियन श्री. सुनील खूपसे, जिल्हा समन्वयक राजेश पारधी व सर्व आरोग्य व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

rapan bottom