मंत्री रविंद्र चव्हाण उद्या आंगणेवाडी श्री भराडीदेवीचे घेणार आशिर्वाद
मालवण : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. या पहिल्या यादीमध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील आ. नितेश राणे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री रविंद्र चव्हाण सोमवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सिंधुदुर्गातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या दर्शनाला येणार आहेत.

