बुधवळे मळेशेतवाडी येथील सुलोचना जाधव कुटुंबियांच्या घरातील वीज उपकरणे जळून नुकसान
माजी उपसभापती राजु परुळेकर यांनी केली पाहाणी
मालवण : मालवण तालुक्यातील परतीच्या पावसाची बरसात विजांच्या कडकडाटासह सुरु आहे. काही ठिकाणी नुकसानीच्या घटना घडत आहेत. बुधवळे मळेशेतवाडी येथील सुलोचना गोविंद जाधव यांच्या घरावर वीज कोसळल्याने घरातील वीज उपकरणे जळून मोठे नुकसान झाले आहे.
वीज पडून घरातील इलेक्ट्रिक साहित्य, फॅन, फ्रिज, टीव्ही जळून गेले. जाधव कुटुंबियांचे जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. प्रशासनास नुकसानीची माहिती दिली. तसेच जाधव कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

