Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

मालवण माजी नगरसेविका पूजा करलकर यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्रदान

मालवण माजी नगरसेविका पूजा करलकर यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्रदान

मालवण : समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार मालवण येथील माजी नगरसेविका पूजा प्रमोद करलकर यांना नुकताच कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे देऊन सन्मानित करण्यात आले. समर्थ सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, संचालक सागर देसाई, संचालक अस्लम शेख, संचालक सुहास पाटील व डॉ. बाळ माने यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरवर्षी समर्थ सोशल फाउंडेशन संस्थेकडून राज्यभरात सामाजिक कार्य करून लाखो लोकांना व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त करण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. सौ पूजा करलकर यांनी व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामामुळेच त्यांना यावर्षीचा हा पुरस्कार देण्यात आला

यापुढेही असेच आपले उल्लेखनीय काम निश्चित चालू ठेवून देशाच्या हितासाठी खारीचा वाटा म्हणून काम करत राहणार असल्याचे यावेळी सौ पूजा करलकर यांनी सांगितले.

सुमारे 1000 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक, संचालक, प्रमोद करलकर, व मित्रपरिवार उपस्थित होता.

rapan bottom