Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

मैत्रिणीवरून कॉलेज विद्यार्थ्यांत हाणामारी

मैत्रिणीवरून कॉलेज विद्यार्थ्यांत हाणामारी

चौघांना अटक आणि जामीन

निलेश जोशी | कुडाळ : मैत्रिणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर बेदम मारहाणीत झाल्याने येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा विद्यार्थी मॅकविन मारी फर्नांडिस (वय २२, रा. रेवतळे मालवण, सध्या राहणार कणकवली) हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी वैभव मनोज कांबळे (वय २२, रा. लक्ष्मीवाडी,कुडाळ) याच्यासह चौघाना पोलिसांनी अटक करून शनीवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्यांची जामिनावर मुक्तता केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन विद्यार्थिनीला आपल्या बद्दल काय सांगितले, अशी विचारणा करीत रागाने एक युवक व त्याच्या सहकाऱ्यांनी येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात शिकणाऱ्या मॅक्वीन मारी फर्नाडिस (20, मूळ रा.मालवण रेवतळे, सध्या रा कणकवली) याला दुचाकीवर बसवून काही अंतरावर नेले आणि शिवीगाळ व मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना कुडाळ शहरात एस एन देसाई चौकात गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुडाळ पोलीसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. यात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. यातील संशयित वैभव मनोज कांबळी (21,रा. लक्ष्मीवाडी कुडाळ), रोहन महेश शिरसाट (19,रा. उद्यमनगर कुडाळ), प्रज्वल नितीन सावंत (22, रा. वेताळबांबर्डे ), सुरज दिपक राऊळ ( 22, कुडाळ - नाबरवाडी ) अशी नावे आहेत. या चौघांना शनिवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. नंतर त्या चौघांची जामीनावर मुक्तता करण्यात आली.

मॅक्वीन फर्नाडिस हा येथील महाविद्यालयात शिकत आहे. गुरुवारी सायंकाळी येथील एस एन देसाई चौकात वैभव कांबळी यांने मॅक्वीन फर्नाडिस याला रोहन शिरसाट याच्या स्कुटीवर बळजबरीने बसण्यास सांगितले. त्याच्या स्कुटीवर मॅक्वीन याच्यामागे प्रज्वल सावंत बसला. त्याने महवियालयातील एका विद्यार्थिनीला माझ्याबद्दल काय बोलतो, तुला सांगतो असे म्हणत स्कुटीने त्या चौका पासून तहसीलदार नजीक असलेल्या गार्डन परिसरात नेले. दुचाकीवरून नेत असताना मॅक्वीन याला सातत्याने हाताच्या थापटाने मारहाण केली. गार्डनकडे गेल्यानंतर वैभव कांबळी, रोहन शिरसाट व प्रज्वल सावंत व अन्य एकाने हाताच्या थापटाने मॅक्वीनच्या मानेवर, पाठीवर मारहाण केली. रोहन शिरसाट याने लाकडी दांड्याने त्याच्या पायावर मारहाण केली. तसेच अन्य दोन अनोळखी युवकांनी तेथे येत मॅक्वीनला मारहाण केली. वैभव कांबळी याने शिवीगाळ करून एका विद्यार्थिनीची माफी मागायला लावली व हातपाय तोडुन ठार मारण्याची धमकी दिली. शुक्रवारी रात्री या प्रकरणी पाच जणावर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यातील चार जणांना आज अटक केली. या बाबतची फिर्याद मॅक्वीन फर्नाडिस याने कुडाळ पोलिस ठाण्यात दिली.

rapan bottom