Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटी सदस्य म्हणून नियुक्ती

राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटी सदस्य म्हणून नियुक्ती

पर्यटन क्षेत्रांतील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार !

निलेश जोशी | कुडाळ : हॉटेल व्यावसायिक आणि पत्रकार राजन सुरेश नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रातील समस्या सोडणवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे राजन नाईक यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर या महाराष्ट्रातील शिखर संस्थेवर गव्हर्निंग कौन्सिल मेंबर म्हणून राजन नाईक यांची नियुक्ती यापूर्वीच झाली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत टुरिझम अँड हॉस्पिटलिटी कमिटी ही कार्यरत आहे.

या कमिटीद्वारे पर्यटन क्षेत्रातील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम चेंबरच्या माध्यमातून केले जाते. या कमिटीचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून या कमिटीवर सदस्य म्हणून कुडाळ येथील हॉटेल व्यावसायिक राजन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजन नाईक यांनी यापूर्वीही या कमिटीवर काम केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या पर्यटन समितीचे ते अध्यक्ष आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र शासनाने घोषित केलेला आहे. या जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्माण झाले आहेत पण काही समस्याही या क्षेत्रात असून त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहील असे राजन नाईक यांनी सांगितले आहे

rapan bottom