मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग कॉलेज मालवण या ठिकाणी कार्यरत असणारे प्राध्यापक डॉ मल्लेश खोत यांनी मुंबई युनिव्हर्सिटीच्या टी वाय बी कॉम या वर्गाकरिता लागू असलेल्या अभ्यासक्रमानुसार टी. वाय. बी. कॉम. या वर्गाकरिता 'कामगार कल्याण आणि प्रथा' भाग -१ हे पुस्तक लिहिले आहे.
याचे प्रकाशन कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून परमपूज्य परमात्मराज महाराज ( दत्त देवस्थान आडी) देविदास महाराज , कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील साहेब, दत्तगुरु बँकेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोत, प्रियदर्शनी महिला बँकेची मॅनेजर जगन्नाथ खोत यांच्या हस्ते करण्यात आले.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य परमात्माराज महाराज दत्त देवस्थान आडी या ठिकाणी प्रति पौर्णिमेप्रमाणे परमात्म राज महाराजांचे प्रवचन व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता यावेळी साधारण सात हजार पेक्षा अधिक भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशा या कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक मल्लेश खोत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले. सदर पुस्तके मुंबई युनिव्हर्सिटीच्या टी. वाय. बी. कॉम. या वर्गाकरिता सिल्याबस नुसार लिहिण्यात आले . हे पुस्तक मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या कॉलेजला उपयोगी आहे.
लेखक लेफ्टनंट प्राध्यापक मल्लेश खोत हे सध्या सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र व राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख, म्हणून काम करतात लेखक लेफ्टनंट हे एका शेतकरी कुटुंबातील आहेत. शेतीतील कामे करीत करीत आई-वडिलांना हातभार लावत बारावीपर्यंत शिक्षण घेऊन बारावीनंतर आर्थिक परिस्थितीमुळे कोल्हापूर या ठिकाणी एका बुलडोजर कंपनीमध्ये क्लार्क कम मॅनेजर म्हणून कामाला लागले . त्या ठिकाणी १६ वर्षे मॅनेजर म्हणून काम केले असल्यामुळे त्यांना औद्दोगिक क्षेत्रातील कामगारांच्या बाबतीत आणि उद्दोगाच्या बाबतीत चांगलाअनुभव आहे तसेच शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेती आणि शेती कामगार याबाबतीत देखील प्रदीर्घ अनुभव आहे . उद्दोग क्षेत्रात मॅनेजर म्हणून काम करीत असताना बी. ए., एम. ए., एम. फील., पीएच.डी., जी.डी.अँड ए, अश्या वेगवेगळया पदव्या काम करीत,अर्थार्जन करत प्राप्त केल्या आहेत.
सन 2012 मध्ये सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये त्यांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी एनसीसीचा असोसिएट एनसीसी ऑफिसर हा तीन महिन्याचा प्री कमिशन मिलिटरी कोर्स कामठी नागपूर या ठिकाणी पूर्ण करून लेफ्टनंट हे पद प्राप्त केले.त्यानंतर एम.बी.ए. ही देखील डिग्री प्राप्त केली आहे. लेखक मल्लेश खोत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेत असतात. मालवण नगरपालिका, मालवण पोलीस स्टेशन, मालवण तहसील सिंधुदुर्ग कलेक्टर ऑफिस ओरस या ठिकाणी राबविल्या जाणाऱ्या अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये व्यक्तिगत व एनसीसीच्या माध्यमातून उत्साहाने भाग घेत असतात.
आतापर्यंत 29 रिसर्च पेपर, आर्टिकल्स आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय, पातळीवरील पब्लिकेशन मध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. त्याचबरोबर दोन पुस्तकांचे लिखाण पूर्ण झालेले आहे, काही पुस्तकांचे लिखाण अजून चालू आहे, मुंबई युनिव्हर्सिटी या ठिकाणी लेबर वेल्फेअर या विषयाचे ते सध्या चेअरमन आहेत.
संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर सेक्रेटरी गणेश कूशे, सीडीसी अध्यक्ष ॲडव्होकेट समीर गवाणकर , संदेश कोयंडे, साईनाथ चव्हाण,विजय केनवडेकर , ओरसकर, डॉक्टर झाटीये ,भाऊ सामंत ,महादेव पाटकर, इतर सर्व संस्था पदाधिकारी प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

