मालवण सागरी किनारपट्टीवरील हायस्पीड ट्रॉलर घुसखोरी प्रश्नी निलेश राणे आक्रमक
मालवण | प्रतिनिधी : मालवण सागरी किनारपट्टीवरील तारकर्ली समोर महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाने शनिवारी पहाटे कारवाई करत ताब्यात घेतला. या बाबत भाजपा नेते निलेश राणे यांनी मत्स्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच हायस्पीड ट्रॉलर हलू देणार नाही. प्रसंगी मला आरोपी करा मात्र हायस्पीड ट्रॉलर सोडणार नाही अशी आक्रमक भुमिका निलेश राणे यांनी घेतली आहे.
स्थानिक मच्छिमार यांच्या मासेमारी जाळ्यांचे हे ट्रॉलर मोठया प्रमाणात नुकसान करत आहेत. मच्छिमारांच्या छोट्या बोटिंच्या अंगावर येतात. मासळीची लूट करतात. यामुळे स्थानिक मच्छिमार हवालदिल, त्रस्त झाले आहेत. मत्स्य विभागाने हायस्पीड वर कठोर कारवाई करावी याबाबत काही मच्छिमार यांनी भाजपा नेते निलेश राणे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. मत्स्य अधिकारी यांना कडक सूचना करा, हायस्पीड बो्टींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होती. त्यावेळी निलेश राणे यांनी अधिकारी वर्गाला संपर्क साधून सातत्याने कारवाई करा. बोटी पकडा, बोटी सुटता नये असे सांगितले होते. त्यानंतर धडक कारवाई सुरु झाली.
मात्र निलेश राणे आज भुमिका मांडताना सांगितले, कारवाई सातत्याने सुरूच राहिली पाहिजे, स्थानिक मच्छिमार यांना त्रास होता नये. पकडलेल्या हायस्पीड बोटी सुटता नये. आम्ही सोडू देणार नाही प्रसंगी माझ्यावर गुन्हे दाखल करा आरोपी करा असे निले्श राणे म्हणाले आहेत.
निलेश राणे मच्छिमारांच्या पाठीशी
मच्छिमार समाजाचा आवाज बनून खंबीर पणे पाठीशी राहिलेल्या निलेश राणे यांच्या भूमिकेचे मच्छिमारांनी आभार मानले असून यापूर्वीही अनेक मच्छिमार प्रशनी निलेश राणे यांनी खंबीर साथ दिली असून सातत्याने देत असल्याचे मच्छिमार यांनी माहिती देताना सांगितले.

