Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

भाजपा नेते निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना | हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई करा

भाजपा नेते निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना | हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई करा

मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाने मालवण किनारपट्टीवर पकडला

मालवण | प्रतिनिधी : मालवण सागरी किनारपट्टीवरील तारकर्ली समोर महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाने शनिवारी पहाटे कारवाई करत ताब्यात घेतला. या बाबत माहिती मिळताच भाजपा नेते निलेश राणे यांनी मत्स्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कठोर कारवाई बाबत सूचना केल्या आहेत.

स्थानिक मच्छिमार यांच्या मासेमारी जाळ्यांचे मोठया हे ट्रॉलर मोठया प्रमाणात नुकसान करत आहेत. मच्छिमारांच्या छोट्या बोटिंच्या अंगावर येतात. मासळीची लूट करतात. यामुळे स्थानिक मच्छिमार हवालदिल झाले आहेत. यासाठी कारवाई कठोर व्हावी याबाबत या आधी लक्ष वेधले होते. आज कारवाई झाली मात्र यापुढेही कारवाई अशीच चालू राहिली पाहिजे. अश्या सूचना निलेश राणे यांनी केल्या. अशी माहिती जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी दिली आहे.

बाबा परब व स्थानिक पदाधिकारी मच्छिमार यांनी सर्जेकोट या ठिकाणी जाऊन निलेश राणे यांच्या सुचनेनुसार कठोर कारवाई व्हावि याबाबत अधिकारी वर्गाला सांगितले.

काही दिवसांपूर्वी सर्जेकोट मालवण येथील मच्छिमार हायस्पीड ट्रॉलरच्या त्रासाबाबात माहिती देण्यासाठी तसेच मत्स्यविभागाच्या वतीने कठोर कारवाई व्हावी. ही मागणी घेऊन भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडे गेले होते. त्यावेळी निलेश राणे यांनी अधिकारी वर्गाला संपर्क साधून सातत्याने कारवाई करा जे काही आवश्यक सहकार्य लागेल ते आम्ही देऊ असे सांगितले होते. अशी माहिती बाबा परब यांनी दिली.

दरम्यान आज पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलरमध्ये पापलेट, सौदाळा, बांगडा, सुरमई, कट्टर, बळा, कटल यांसह अन्य मासे ट्रॉलर मध्ये मोठया प्रमाणात असून त्याचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी हायस्पीड ट्रॉलर सर्जेकोट जेटी येथे आणण्यात आला आहे.

rapan bottom