Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

कोकणातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य ; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

कोकणातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य ; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांचा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा

सिंधुदुर्गातील मृद व जलसंधारण विभागांतर्गत कामांना गती द्या - मंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही योजनांची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी काही भागांमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्यमान मापदंड अपुरे ठरत असून त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागांतर्गत येणारे विविध लघु सिंचन योजनांचा आढावा घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या समवेत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, व्यवस्थापकीय संचालक वि.म.देवराज, कार्यकारी अभियंता धनंजय साळुंखे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील योजनेअंतर्गत प्रस्तावित २१ कामे, सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त २३ कामे तसेच भूसंपादन निधी आवश्यक असलेली २६ कामे यांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.
कणकवली तालुक्यातील शिरवल, कुंभवडे, ऐनारी, वैभववाडी - कुंभवडे आणि करूळ येथील प्रलंबित योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली. विशेषतः ज्या योजनांची ७५ ते ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत, त्या योजनांना तातडीने निधी देऊन लवकरात लवकर कार्यान्वित करावे. निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी आणि सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधितांना दिल्या.
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ लघु सिंचन प्रकल्पांना आवश्यक असलेली सुधारित प्रशासकीय मान्यता जलसंपदा विभागाच्या सुधारित मापदंडानुसार देण्यात येईल. या प्रकल्पांना आवश्यक असलेला निधी लवकरात लवकर देऊन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.

rapan bottom