Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

" सिंधु निसर्ग संवाद " कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता जपण्याचा संकल्प !

" सिंधु निसर्ग संवाद " कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता जपण्याचा संकल्प !

मालवण | राहुल जाधव : युथ बीट्स फॉर क्लायमेट, इकोमेट्स, स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि इकॉलॉजिकल सोसायटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात " सिंधु निसर्ग संवाद " कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यक्रमासाठी इकॉलॉजिकल सोसायटीचे केदार भागवत सर, मा. सायली नेरुरकर तसेच चौकुळ येथील प्राध्यापक श्री. बाळकृष्ण गावडे सर , महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कैलास राबते सर तसेच सिंधुदुर्ग मानद वन्यजीव रक्षक- श्री. काका भिसे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि पाहुण्यांची ओळख कांदळवन अभ्यासक दुर्गा ठिगळे यांनी करून दिली. वीरश्री रावराणे यांनी प्रास्ताविकात या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा (टोपीवाला हायस्कूल) येथील मुलांनी 'उठा राष्ट्रवीर हो' हे जोशपूर्ण गीत सादर केले. निसर्गाचा होणारा -हास लक्षात घेता निसर्गप्रेमींनी आता पेटून उठायला हवं ही संकल्पना लक्षात घेता मुलांच्या या गीतातून राष्ट्र प्रेमाचा सोबत निसर्ग प्रेमाचा संदेश देण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य राबते सर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना पर्यावरणाची जपणूक करणे आवश्यक असल्याचे सांगितले. "युथ बिट्स फॉर क्लायमेट " या संस्थेच्या अध्यक्ष मेगल डिसोजा यांनी पृथ्वीचा होणारा -हास लक्षात घेता आपल्यासारख्या तरुण पिढीला आणि पुढील पिढ्यांना अजून जगायचे आहे. जैवविविधता अनुभवायची आहे. यासाठी ज्या गोष्टी नष्ट होत आहेत, त्या जपण्यासाठी प्रयत्न करावा म्हणून मालवणातील युवकानी एकत्र येऊन युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेची स्थापना केल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. केदार भागवत यांनी 'शाश्वत पर्यटन' या विषयावर बोलत असताना कोणत्याही एका गोष्टीची मागणी वाढली की त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो, यासाठी पर्यावरणाचे संतुलन सांभाळून शाश्वत विकास आणि पर्यटन यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे सांगितले.



दुसऱ्या वक्त्या सायली नेरूरकर यांनी सागरी किनारा यावर अभ्यास करतांना दहा शोधनिबंध लिहिलेले आहेत. त्यानी कोस्टल 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत किनारी परिसंस्था याचा अभ्यास करताना मालवण आचरा परिसर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काही किनारे अभ्यासले असता सुमारे 650 पेक्षा जास्त जैवविविधता अभ्यासता आली त्याची नोंद केली . पर्यटन करत असताना सिंधुदुर्ग जिल्हा हा अनुभवावा लागतो, हे लक्षात घेऊन ओरबाडण्याची प्रवृत्ती सोडावी आणि इथला निसर्ग अनुभवावा यावर भर द्यावा, असे विचार मांडले.

डॉक्टर जयेंद्र परळेकर यांनी पर्यावरण आणि जैवविविधता सांभाळायची असेल तर अनेकदा कायदेशीर लढे लढत असताना पुराव्यासाठी नोंदी असणे आवश्यक आहे. तरच आपण आपली बाजू सक्षमपणे मांडू शकतो याबाबतचे त्यांचे अनुभव सांगितले
सहभागी झालेल्या पर्यावरण प्रेमींसाठी सहा गट करण्यात आले होते वन्यजीव आणि अधिवास, पाणथळ जागा, समुद्र आणि कांदळवन, कातळ सडा आणि जैवविविधता, जल जंगल आणि डोंगर, निसर्ग संवर्धनाचे इतर मुद्दे असे गट करण्यात आले होते. या विषयांच्या अनुषंगाने चर्चा करावी आणि आपली भूमिका प्रत्येक गटाने मांडावी, असे सांगण्यात आले होते.

‘वन्यजीव आणि अधिवास’ यावर बोलताना जंगलातील जुनी झाडे तोडून उत्पन्न देणारी नवीन लागवड केली जाते त्याचा परिणाम वन्यजीवांचे खाद्य हिरावून घेतले जाते. यासाठी जंगलतोड थांबवली पाहिजे. दुर्मिळ झाडे जपायला हवीत. तसेच कोळी, मुंगी या सारख्या least known प्रजातींची तस्करी होत आहे, त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. अपघात ग्रस्त वन्यजीवांन साठी पशुवैद्यकीय अधिकारी नेमणूक असायला हवी असे मुद्दे मांडण्यात आले.
‘पाणथळ जागा’ याविषयी चर्चा करतांना पाणथळ जागांवर बांधकामाला परवानगी देऊ नये. पाणथळ जागेत कचरा टाकला जाऊ नये. प्लास्टिकचे रिसायकलिंग करण्याचा प्रकल्प आणला जावा अशा सूचना केल्या गेल्या.

‘समुद्र आणि कांदळवन’ याविषयी बोलताना वाळू उपसा अती होत असल्याने त्याचे होणारे दुष्परिणाम. अवैध मासेमारी, प्रवाळांचे होणारे नुकसान. समुद्रामध्ये साठलेला कचरा अशा गोष्टींचा उहापोह करण्यात आला. ‘कातळसडे आणि जैवविविधता’ या विषयावरती बोलताना कातळ सड्यावर लागणारे वणवे बऱ्याच वेळा आकस बुद्धीने लावले जातात त्याबाबत जाणीव जागृती व्हायला हवी. तसेच खाण उद्योगांना यापुढे परवानगी देताना विचार व्हावा. पूर्वीच्या अंधश्रद्धा या कातळ सड्यांची जपणूक व्हावे यासाठी पसरवल्या गेल्या होत्या त्या मागची भूमिका लक्षात घ्यावी. असे मुद्दे मांडण्यात आले.
‘जल जंगल आणि डोंगर’ याविषयी बोलताना जंगल आपल्याला आर्थिक सहाय्यक कसे मिळवून देईल. खाजगी जमिनीतून शाश्वत पर्यटनाच्या मार्गाने उत्पन्न कसे वाढवेल याबाबत प्रयत्न व्हायला हवेत असे विचार मांडण्यात आले.

इतर निसर्ग संवर्धनाच्या मुद्द्यांमध्ये 'चुकीच्या पद्धतीने होणारे पर्यटन, अमली पदार्थांचा वाढता वापर, चुकीच्या पद्धतीने होणारे मंदिरांचे जीर्णोध्दार, भेडला माड पानांच्या तोडीमुळे जैवविविधतेचा ऱ्हास, निसर्ग दूतांची प्रत्येक गावात नेमणूक' अशा गोष्टी चर्चेला आल्या भोजनोत्तर सत्रात तिसरे तज्ञ वक्ते प्रा. बाळकृष्ण गावडे सर यांनी आपल्या जिल्ह्यातील जैवविविधता आणि वनस्पतींच्या प्रजातींची माहिती दिली. त्याचबरोबर इतरांनी काय करावं यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करावी. आपण सुमारे एक लाख झाडे नैसर्गिक रंग तयार करणारी गेल्या काही वर्षात जिल्ह्यात लावली. त्याच्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला. अशी अनेक झाडे आपल्याकडे आहेत त्याचा पूरक व्यवसाय म्हणून कसा उपयोग करता येईल याचा विचार व्हायला हवा. प्रत्येकाने दहा झाडे लावायला हवीत. "आपण आपल्या श्वासाची आणि सरणाची किंमत ओळखायला हवी". बिया जतन करायला हव्यात असे सांगत स्वतः करत असलेले व्यापक स्वरूपाचे निसर्ग संवर्धनाचे काम सर्वांसमोर ठेवले.

कार्यशाळेस सिंधुदुर्गमधील निमंत्रित निसर्गप्रेमी वनस्पती अभ्यासक मिलिंद पाटील, पक्षी अभ्यासक प्रविण सातोसकर, प्राध्यापक हसन खान सर, कांदळवन अभ्यासक लक्ष्मण तारी, स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षक गोविंद धुरी,स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षक वसंत येरम, पारंपरिक मच्छिमार जयवंत जाधव, केळुस मच्छिमार संस्था अध्यक्ष गोविंद केळुसकर, गुरुराज साटम, शरद धुरी, ओंकार गावकर, हिमांशु लाड, सुनेत्रा गावडे, कोळी संशोधक गौतम कदम, निखिल नेरकर, एकनाथ परब, राजेश कविटकर, कौस्तुभ बापर्डेकर, मयुरेश तारी, मंदार गावडे तसेच युथ बिट्स फॉर क्लायमेट- इकॉमेट्स सदस्य, इकोलोजिकल सोसायटी पुणे, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

समारोप करत असताना प्राध्यापक सुमेधा नाईक यांनी आजची कार्यशाळा ही निसर्गावर काम करणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये परस्परांमध्ये संवाद निर्माण व्हावा, एकमेकाचे काम एकमेकांना समजावे, मार्गदर्शन मिळावे, मदत मिळावी अशा उद्देशाने आयोजन केले होते, तसेच निसर्ग संवर्धनासाठी पुढील टप्पे स्पष्ट केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला जाईल. यामध्ये आपण करत असलेले काम, नवीन योजना यांचा उल्लेख आपण करत राहूया आणि एकमेकांशी संवाद साधूया असे सांगत सशक्त संवादासाठी आवाहन केले. आभार प्रदर्शन "युथ बिट्स फॉर क्लायमेट " चे स्वप्निल गोसावी यांनी केले तर सूत्रसंचालन चारुशीला देऊलकर यांनी केले. कार्यशाळेच्या ठिकाणी नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात फ्रान्सिस शिवलकर यांनी केलेली पर्यावरण पूरक चुडतांची सजावट लक्षवेधी ठरली.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom