मालवण | प्रतिनिधी : मालवण कुंभारमाठ येथील नाजिया सनाऊला खान (वय 20 ) या युवतीने घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. तिच्या आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार नाजिया ही दोन महिन्यापासून नोकरीच्या प्रयत्नात होती. ती घरात गप्प असायची. शनिवारी रात्री नाजियाची आई घरात नमाज पठाण करत होती तर ती बाहेरच्या खुर्चीवर बसली होती. वडील आणि भाऊ वायरी येथे नमाज पठण करण्यास गेले होते. आईने नमाज पठण करून झाल्यावर नाजिया हिला शोधण्यास सुरुवात केली तेव्हा ती घरानजीकच्या आंब्याच्या झाडाला गळफास स्थितीत लटकताना आढळून आली. घरी तिचे वडील आल्यावर त्यांनी तात्काळ मालवण पोलिसांना याची माहिती दिली असता महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत सुशांत पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महतेचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत मालवण पोलीस अधिक तपास करतं आहेत.

