Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मालवणात स्वछता अभियान

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मालवणात स्वछता अभियान

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने हजारो श्री सदस्य उपस्थित : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच ठिकाणी मोहीम

मालवण | प्रतिनिधी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त
भारताचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मालवण सिंधुदुर्गसह देशभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेतलेल्या स्वच्छता अभियान १ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्या पासून राबविण्यात आले. या स्वच्छता अभियाना अंतर्गत ग्रामीण रुग्णालय मालवण येथे ४६० सदस्यांनी परिसर स्वच्छता करत ४ टन कचरा गोळा केला. पशुवैदयकिय दवाखाना जानवली येथे ३९० सदस्यांनी ७ टन कचरा गोळा केला, शिरोडा वेळागर समुद्रकिनारा वेंगुर्ला येथे ३८४ सदस्यांनी १६ टन कचरा गोळा केला, पवनचक्कि व गार्डन परीसर देवगड येथे १०४ श्री सदस्यांनी 310 किलो व देवगड समुद्रकिनारा येथे १४७ सदस्यांनी १६५० किलो कचरा संकलन केले. सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत या पाच ठिकाणावर एकूण १४८५ श्रीसदस्य उपस्थित होते. अंदाजित २३ टन ५६० किलो कचरा संग्रहित करून १७८४४ चौ.मी. परिसर, २ कि.मी. समुद्रकिनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला.

या अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्यातील श्री बैठक मालवण, चिंदर, गावराई, परुळे, हळवल, जानवली, गोठणे,कुवळे, फोंडाघाट, कासार्डे, तळेरे, वैभववाडी, नांदगाव, कसाल, शिरोडा, पिंगुळी, बांदा, चराठा, माणगाव, तळवडे, वेंगुर्ला, ओरोस, मुटाट, वाडा, जामसंडे, शिरगाव, बागमळा अशा एकूण २७ बैठका सहभागी झाल्या.

या कार्यक्रमा अंतर्गत सौ. ममता वराडकर नगराध्यक्ष मालवण, श्री. दीपक पाटकर उपनगराध्यक्ष मालवण, सौ. पूनम चव्हाण आरोग्य सभापती, श्रीम. जयमाला मयेकर माजी नगरसेविका, ग्रामीण रुग्णालय मेडिकल ऑफिसर श्री. बालाजी पाटील, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन वर्ग १ च्या अधिकारी डॉ. ज्योती निशिकांत खरे, सौ. लतिका रेडकर, सरपंच शिरोडा, सौ. सुमती मसुरकर परब. पंचायत समिती सदस्य, श्री. निलेश मयेकर मंडळ निरीक्षक, श्री. सनी मोरजकर पोलीस पाटील, श्री. प्रसाद कदम पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरोडा संबंधित सरकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.
प्रत्येक जनमानसाला आपल्या निती मुल्यांची कर्तव्याची व निसर्ग जोपासण्याची जाणिव व्हावी यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य शिबिर, रक्तदान शिविर आर्थिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, पौढ साक्षरता अभियान, शैक्षणिक साहित्य वाटप, अद्धा निर्मूलन मार्गदर्शन तसेच पर्यावरण समतोल व सुरक्षित राखण्यासाठी स्वच्छता अभियान, वृक्षलागवड व संवर्धन, श्रीगणेश विसर्जन घाट येथील निर्मल्य संकलन करून खत निर्मीती अभियान, जल पुनर्भरण, विहिर स्वच्छता अभियान जेणेकरून राष्ट्रहित जोपासले जाईल. याच अनुशंगाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom