Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

नशा मुक्त भारत अभियान

नशा मुक्त भारत अभियान

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांचा उपक्रम

मालवण शहर येथील अभियानाचा नगराध्यक्ष यांच्या हस्ते शुभारंभ

मालवण : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यामानाने देशभरात नशा मुक्ती भारत अभियान राबविण्यात येत असून मालवण शहरात या अभियानाचा शुभारंभ मालवण नगरपरिषद येथे नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी चलचित्राच्या माध्यमातून तसेच पत्रके वाटून नशा मुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

या नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची जनजागृतीपर चलचित्र दाखविणारी व्हॅन मालवण शहरात दाखल होऊन शाळा व शासकीय कार्यालये याठिकाणी भेटी देऊन नशा मुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर, नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी तसेच ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या डॉ. भारती बेहेन, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भारती बेहेन, वर्षा दीदी, निलिमा दीदी, राखी दीदी, मेघा दीदी, नूतन दीदी तसेच अशोक, नारायण व इतर उपस्थित होते.

यावेळी डॉ. भारती बेहेन यांनी नशामुक्त भारत अभियान या उपक्रमाची माहिती दिली. भारतात युवा व तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी गेली असून यामुळे रोज अनेक जणांचा मृत्यू होत आहे, तसेच अनेक कुटुंबेही उध्वस्त होत आहेत, त्यामुळे सर्वांनी व्यसनांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी जनजागृती होत आहे, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक होत आहे. असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे, तरुणांनी व्यसनमुक्त होण्याबरोबरच तणावमुक्त झाले पाहिजे, या उपक्रमास नगरपालिकेचे आवश्यक ते सहकार्य लाभेल, असे सांगितले. यावेळी नगरपालिकेतर्फे अधिकारी हेमराज चव्हाण यांनीही विचार मांडत उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom