मालवण | प्रतिनिधी : जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नं. 1 येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गौरव दिनाच्या औचित्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक मराठी वेशभूषा परिधान करत प्रभातफेरी काढली.
या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाताडे, शिक्षक संजय जाधव, सौ. देशमुख मॅडम, अंगणवाडी मदतनीस सौ. माळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास परब यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व पालक यांनी उपस्थिती दर्शवली. मोठया उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
अमित खोत, मालवण

गोळवण नं. 1 प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
