मालवण : भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांची त्यांच्या मुंबईतील अधिश निवासस्थानी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी भेट घेतली. विविध विषयांवर खा. राणे यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांना प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्बेत आता ठणठणीत असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी त्यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी दाजी सावजी उपस्थित होते.

