Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

श्री रवळनाथा ने हुकूम दिला आणि वायंगणी ग्रामस्थांनी वेशी बाहेरील मुक्काम सोडला!

श्री रवळनाथा ने हुकूम दिला आणि वायंगणी ग्रामस्थांनी वेशी बाहेरील मुक्काम सोडला!

वायंगणी गावची देवपळण- गावपळण

मालवण | प्रतिनिधी : मालवण वायंगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाने तीन दिवसा नंतर गाव भरण्यासाठी हुकूम दिल्याने गेले तीन दिवस तीन रात्र वायंगणी वेशी बाहेर स्थिरावलेल्या ग्रामस्थाचा वेशी बाहेरील मुक्काम संपला. आज सकाळी ११ वाजता वायंगणी बारापाच मानकरी आणि ग्रामस्थ मिळून श्री देव रवळनाथा ला परतीचा कौल प्रसाद लावण्यात आला. यावेळी श्री रवळनाथ देवतेने गाव पुन्हा भरण्यासाठी आपला हुकूम दर्शविल्याने ग्रामस्थांनी वेशी बाहेर थाटलेले संसार आवरा आवर करून मुक्काम सोडला.

मालवण वायंगणी गावचा त्रैवार्षिक देवपळण गावपळण संपन्न झाला. श्री देव रवळनाथ व प्रमुख मानकरी ग्रामस्थ हे चिंदर गोसावी वाडी येथील श्री देव रवळनाथ वायंगणी देवपळण निवासस्थान याठिकाणी थांबले होते. तीन दिवस याठिकाणी विविध धार्मिक संस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्यासाठी असलेल्या ग्रामस्थांनी आपली पारंपरिकता जपत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला. तर कालावल नदी किनाऱ्यावर राहुट्या ( झोपड्या ) बनवून राहिलेल्या ग्रामस्थानी गावपळण सोहळ्या निमित्त निसर्गाच्या सानिध्यात मौज मज्जा आणि आनंद उत्साहाचा क्षण अनुभवला.

आज गुरुवारी कौलप्रसाद घेतल्या नंतर दुपारी गोसावी वाडी येथील ग्रामस्थानी वायंगणी ग्रामस्थांसाठी महाप्रसाद ठेवला होता. महाप्रसाद झाल्या नंतर सर्व बारापाच मानकरी ग्रामस्थ जमून दुपारी 2 वाजता देवाचे श्रीफळ घेऊन वायंगणी गावात श्री रवळनाथ मंदिरात आले. याठिकाणी देव स्थिर करण्यात आला. श्री रवळनाथ देवाला गाऱ्हाणं घालून पुन्हा आपण राहत असलेल्या ठिकाणी सामना आणि गुरे वैगरे आणायला ग्रामस्थ पुन्हा वेशी वर आले. पहिला वायंगणी गावात देव स्थिर केला. जोपर्यंत देव गावात येत नाही तो पर्यंत कुणीही ग्रामस्थ मंदिरात प्रवेश केला नव्हता. देवाच्या मागोमग वायंगणी गावची रयत आली. आशा प्रकारे मालवण वायंगणी गावची त्रैवार्षिक देव पळण गाव पळण उत्साहात संपन्न झाली.

rapan bottom