Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच’ सिंधुदुर्ग ने मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच’ सिंधुदुर्ग ने मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

मुंबई मंत्रालयात घेतली भेट ; शिक्षण संस्था, शिक्षक यांच्या वतीने मानले आभार

शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत पटसंख्या व अतिरिक्त शिक्षक धोरणात बदल करण्यासंदर्भात मंत्री राणे यांनी मांडली होती महत्वपूर्ण भूमिका

मुंबई ; कोकणातील मराठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील भौगोलिक स्थितीचे महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून पटसंख्या व अतिरिक्त शिक्षकांच्या बद्दलच्या धोरणात फेरबदल करण्यास शिक्षण मंत्रालयाला प्रवृत्त केले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग कोकणातील शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या समस्या यावर अभ्यासपूर्ण भूमिका मांडली होती.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील अनेक शाळा,प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे वर्ग बंद होण्यापासून वाचवले आहेत., त्याबद्दल शिक्षण संस्था, शिक्षक यांच्या वतीने शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्गचा पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.



शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्ग च्या वतीने मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय वेतुरेकर, सदस्य अजित कांबळे,कमलाकांत उर्फ बाळू कुबल आदी उपस्थित होते. यावेळी यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी अध्यक्ष सतीश सावंत सुद्धा उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांना आभाराचे पत्र देत कोकणातील शाळांना आपण वाचवले आहे. शाळा वाचल्या म्हणजेच भावी पिढी साक्ष, सुशिक्षित आणि स्वावलंबी होणार आणि त्यासाठी आपले योगदान अनमोल आहे असे शिष्टमंडळाने पत्रात म्हटले आहे.

ओरोस येथे मोर्चाला सामोरे जात पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षण संस्था आणि शिक्षक यांना शाळेचे वर्ग बंद व्हायला देणार नाही असे सांगितले होते त्या प्रमाणे पालकमंत्री वागत असल्याने आम्हाला अभिमान वाटतो. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो असे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी सांगितले.

rapan bottom