Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर करावी

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर करावी

मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनारी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास तातडीने गती देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.

मंत्रालयात याबाबत पार पडलेल्या आढावा बैठकीत आयटी विभागाचे विरेंद्र सिंग तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे उपस्थित होते. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) युक्त सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याच्या प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियांना विलंब न लावता पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मंत्री राणे यांनी दिले.

मंत्री राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आणि विस्तीर्ण किनारपट्टी लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षेची भक्कम यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवणे, सागरी गुन्ह्यांना आळा घालणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, कोणतीही दिरंगाई न करता काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश मंत्री श्री राणे यांनी बैठकीत दिले.

rapan bottom